ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दोन दलीत मुलांची हत्या प्रकरण लोकस्वराज्य आंदोलनचा महामोर्चा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

मागील चार महिन्यापासून तालुक्यात झालेल्या दोन दलीत मुलांची हत्या झाली.त्यात रुग्ण सेवक जिवन तोगरे व संतोष शिंदे यांची हत्या असून त्यांचे मारेकरी अजूनही मोकाट असून त्या नजीकच्या पोलिस स्टेशन अधिकारी यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे.यासाठी त्या दोन पोलिस अधिकारी शरद आवरी व म्हैसेकर यांना निलंबित करण्यात यावे.

तसेच या प्रकरणाची चौकशी सी आय डी कडून करण्यात यावी.व्यद्याकिय अहवाल देणाऱ्या डॉक्टर वर कार्यवाही करण्यात यावी.

यासाठी जिवती येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून तहसील कार्यालय पर्यंत मोर्चा काढण्यात आला.यावेळी मोर्चाचे नेतृत्व भागवत मोरे यांनी केले तर मार्गदर्शक म्हणून दत्तराज गायकवाड लोकस्वराज्य आंदोलन प्रदेश अध्यक्ष,गोपाळ रायपुरे आर पी आय,चंद्रपूर,समया पसुला मादिगा समाज अध्यक्ष,गडचिरोली, प्रियाताई खाडे आर पी आय चंद्रपूर,होते.मोर्चा ला यशस्वी करण्यासाठी सौ सुनिता नामवाड,संभाजी ढगे लोकस्वरज्य आंदोलन विदर्भ प्रमुख,बाळासाहेब शिंदे,सुबोध चिकटे भीम आर्मी तालुका अध्यक्ष,आशिष नामवाड,गजानन मसुरे,पंडित कांबळे,अमोल कांबळे,राहुल गायकांबळे सुमित ढगे प्रशांत हरगिले, सयाजीराव गायकवाड सह मोठ्या प्रमाणात जिवती तालुक्यातील समाज बांधव उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये