ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अभिवादन

चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे आयोजन

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने येथील प्रियदर्शिनी चौकातील इंदिरा गांधी यांच्या पुतळा परिसरात रविवारी (ता. १९) माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम पार पडला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. तर, काहींनी इंदिरा गांधी यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला कामगार नेते के. के. सिंग, महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष चंदाताई वैरागडे, माजी अध्यक्ष सुनीता अग्रवाल, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष मतीन कुरेशी, बलसिंग गुरम, रमजान अली, माजी नगरसेविका वीणा खनके, माजी नगरसेविका सकीना अन्सारी, प्राचार्य नरेंद्र बोबडे, प्रदीप डे, पप्पू सिद्दीकी, राजू वासेकर, गौस खान पठाण, बापू अन्सारी, पितांबर कश्यप, मनीष तिवारी, बलसिंग गुरम, रवी भिसे, मोहन डोंगरे, अंकुश तिवारी, रफिक भाई, नासीर शेख, सचिन रामटेके, नौशाद शेख, मोनू रामटेके, राजू खजांची, गुंजन येरणे, राजेश वर्मा, सुलतान अशरफी, प्रकाश देशभ्रतार, रामकृष्ण कोंड्रा यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये