ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

मयत, लकवा ग्रस्त कामगाराच्या मुलांना लोडर भरतीत सामावून घेण्याची मागणी

कोरपना तालुका महिला काँग्रेस अध्यक्षाचा पुढाकार ; अल्ट्राटेक सिमेंट कंपनी लोडर भरती प्रकरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

कोरपना तालुक्यातील नामांकित अल्ट्राटेक सिमेंट उद्योगात मागील काही महिन्यापासून लोडर भरती सुरू आहे लोडर मध्ये लावून देण्यासाठी काही कामगार नेत्यांनीच पैसे घेतल्याचा आरोप कामगारांकडून होत आहे पैसे घेतल्याच्या तक्रारीवरून एका लोडरला स्वतःच्या नोकरीचा राजीनामा द्यावा लागला काही दिवसांपूर्वी मयत लकवा ग्रस्त कामगाराच्या मुलांना लोडर भरतीत सामावून घेण्यासाठी आवारपुरात आमरण उपोषण करण्यात आले होते उपोषणाची सांगता होत नाही तोच परत नांदा फाटा येथे मनसेकडून महिला आमरण उपोषणास बसल्या आहेत नांदा ग्रामपंचायतीच्या सत्तेत मनसेचाही सहभाग आहे एकीकडे ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व स्थानिक नेत्यांनी उपोषणाकडे पाठ फिरवली असताना दुसरीकडे कोरपना तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा तथा नांदा ग्रामपंचायतच्या सदस्या आशाताई खासरे व त्यांच्या टीमने पक्ष कोणताही असो माणुसकीचे नाते जपत उपोषण स्थळी भेट देत आवारपुर बिबी नांदा या परिसरातील मयत व लकवा ग्रस्त कामगारांच्या मुलांना लोडर भरती सामावून घेण्याची मागणी अल्ट्राटेक सिमेंट कंपनी व्यवस्थापनाकडे केली आहे मयत व लकवाग्रस्त कामगाराच्या मुलांना लोडर भरतीत सामावून घेण्यासाठी नक्कीच सहानुभूती पूर्वक विचार करणार असल्याचे आश्वासन कंपनी व्यवस्थापनाने दिले आहे

अल्ट्राटेक सिमेंट कंपनीमध्ये लोडिंग मध्ये काम करणाऱ्या कामगारांना सिमेंट डस्टचा फार मोठा त्रास सहन करावा लागतो रस्त्यावरचा डस्ट आपण थोड्यावेळही सहन करू शकत नाही लोडिंग मध्ये काम करणाऱ्या कामगारांचे तर अर्धे आयुष्य डस्ट मध्ये जाते डस्ट मुळे कामगारांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन अनेकांचा अल्पावधीतच मृत्यू होत असतो तर काही कामगारांना कायमचे अपंगत्व येते अशा मयत व लकवा ग्रस्त कामगाराच्या मुलांना लोडर भरतीत सामावून घेणे गरजेचे आहे

आशाताई खासरे
अध्यक्षा
(कोरपना तालुका महिला काँग्रेस)

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये