चंद्रपूरचांदाब्लास्ट विशेषविदर्भ

शेवटच्या माणसाची सेवा करण्याचा संकल्प करा..आ.मुनगंटीवार.

विविध पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

चांदा ब्लास्ट

भारतीय जनता पार्टीसाठी सत्ता हे लक्ष्य नसून शेवटचा माणूस हा केंद्रस्थानी आहे.शेवटच्या माणसाची सेवा करणे,त्यास न्याय मिळवून देणे,हा भाजपाचा उद्देश आहे.त्यामुळे शेवटच्या माणसाची सेवा करण्याचा संकल्प करा.असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी केले.
ते एकोरी प्रभागातील बालविर वार्ड,गजानन भवन येथे गुरुवार(9 सप्टेंबर)ला महानगर भाजपा उपाध्यक्ष व मध्य मंडळ प्रभारी ऍड. सुरेश तालेवार यांच्या पुढाकारातून आयोजित “पक्ष प्रवेश” कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलत होते.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,उपमहापौर राहुल पावडे,स्थायी समिती सभापती रवी आसवाणी,प्रदेश निमंत्रित सदस्य तुषार सोम,भाजपा कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,भाजपा महासचिव नामदेव डाहूले,मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार,संतोष वडपल्लीवार,नगरसेवक राजेंद्र अडपेवार,भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर,भैयालाल कालिवाले,चांद पाशा,सूर्यकांत कुचनवार,राजेंद्र खांडेकर,पियुष राऊत,रोशन मोहितकर यांची मंचावर उपस्थिती होती.
आ.मुनगंटीवार म्हणाले,कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा आहे.त्याने नेहमी सजग असले पाहिजे.जनसंपर्क  पक्ष मजबुती साठी महत्वाचा भाग असून तो होत असेल तरच जनतेच्या समस्या कळतात.कुणालाही कमी लेखू नका.सर्वांना घेऊन चला असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी देवराव भोंगळे यांनी समयोचित मार्गदर्शन केले.
आ.मुनगंटीवार यांचे हस्ते भाजपाचा दुपट्टा परिधान करून 75 परिवारातील शेकडो सदस्यांनी भाजपात प्रवेश घेतला.ज्यात प्रशांत इंगळे, प्रदीप मोगरे, अनिस अशरफ, मनीष मांगरे, गणेश पाडेवार, संजय टेंम्भूकर,  सचिन भोले, शिवम देशवाले, नरेश ठाकरे निलेश मोगरे, निलेश राहुलकर, प्रफुल नंदबंशी, चेतन बुटले, मयंक शर्मा,सचिन मोगरे, करण धुरेवाले, अजय नंदबन्सी,गोपाल देवांगन, स्वप्निल बावणे, सविता नागपुरे, शंकर मोगरे,अक्षय गोसे, महेश जुमडे, मीना पोटफोडे, राजेश्वर गोलरकर, अरुण भोयर, कुणाल दंडेले, गणेश वानखेडे, प्रज्वल गोरलीवार, शुभम भोयर, लोभान गोलरकर, प्रिया गोलरकर,प्रीती जॉन, प्रवीण चलाख, अनिकेत दंडेले, श्रीकांत खामनकर,अक्षय दंडेले, अनिल चव्हाण, अजिंक्य बेले, मोहम्मद रिजवान, अविनाश पिंपळकर, बंडू गौरकर,नंदा गौरकर, संजय यादव,मधुबाई गोवरिया,भोलाराम जगणावाले, चेतन चहारे,अभय गटलेवार, सरिया नंदबंशी, सतीश नंदबंशी, रोहित शुक्ला, मोहित दंडेले,दिलीप आगलावे, शैलेश नागपुरे, प्रभाकर आकेवार,कुणाल रमेश चहारे, अक्षय जुनघरे, दिनेश नागपुरे, गजेंद्र साहू, संजय वाटेकर, जितू धांडले, दिनेश अमृतकर,चंदू नंदबंशी ,अब्दुल बारूदवाला, सुरेश गट्टेवार, अमित फासे, कैलाश कालीवाले, भावनिक आक्केवार, सचिन धांडले, वैभव भोयर, वसंत वैरागडे, आतिश कांबळे, अरविंद कोवे, अजय सराफ यांचा प्रामुख्याने समावेश होता.कार्यक्रमाचे संचालन ऍड सुरेश तालेवार यांनी केले.सूर्यकांत कुचनवार यांनी आभार मानले.या प्रसंगी परिसरातील नागरिकांची मोठ्याने उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button