चंद्रपूरचांदाब्लास्ट विशेषविदर्भ

हैद्राबाद मुक्ती संग्रामाचा वर्धापन लढ्याची प्रेरणा देणारा दिवस

मोदीजींच्या नेतृत्वात देशाची महासत्तेच्या दिशेने वाटचाल - हंसराज अहीर

चांदा ब्लास्ट

हैद्राबाद मुक्ती संग्राम वर्धापन दिनानिमित्त तिरंग्याचे ध्वजारोहण पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री  हंसराज अहीर यांचे शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी या मुक्ती संग्रामातील योध्द्यांचे स्मरण करुन त्यांच्या त्यागातून निजाम राजवटीतून मुक्तता मिळाल्याचे सांगीतले. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची दुरदृष्टी व कणखर नेतृत्वामुळे हे शक्य झाल्याचे गौरवोद्गार काढले. हैद्राबाद मुक्ती संग्राम दिनाचा वर्धापन लढ्याची प्रेरणा देणारा क्षण आहे. वैश्वीक ख्यातीचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात राष्ट्राची सर्वच क्षेत्रात प्रगती झाली असून भारताची महासत्तेच्या दिशेने वाटचाल सुरु झाली असल्याचेही त्यांनी आपल्या संबोधनातून सांगीतले.
कोरपना व जिवती येथे दि. 17 सप्टेंबर रोजी  हैद्राबाद मुक्ती दिन तसेच प्रधानमंत्राी मा. नरेंद्र मोदीजी याचा जन्मदिन सेवा व समर्पण सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महामंत्राी नामदेव डाहुले, केशव गिरमाजी, सुरेश केंद्रे, महेश देवकते, गोदावरीताई केंद्रे, कमलाताई राठोड, अरुण मस्की, राजू घरोटे, नारायण हिवरकर, नूतनकुमार जिवणे, दत्ता राठोड, गोविंद डुकरे, सतिष उपलंचीवार, रामभाऊ मोरे, कवडु जरीले, पुरुषोत्तम भोंगळे, रमेश मालेकर, किशोर बावणे, विशाल गज्जलवार आदिं ची प्रामुख्याने उपस्थिती होती.
प्रारंभी हंसराज अहीर यांनी हैद्राबाद मुक्तीदिन तसेच प्रधानमंत्री मोदीजींच्या जन्मदिवसानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. शालेय विद्यार्थीनीच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी मा. नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्र व विकासाला समर्पित  कार्याचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख करीत प्रधानमंत्रयांनी समाजातील सर्वच घटकांना न्याय देवून सर्वांचा विश्वास संपादन केला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य हमीभाव दिला आहे, तेलबियांची आयात बंद केली, कापूस व गव्हाची निर्यात वाढविली आहे, युरीयाचे भाव स्थिर ठेवले आहे, शेतकऱ्यांना सन्मान निधी देवून त्यांचा सन्मान वाढविलेला आहे. आज त्यांच्या नेतृत्वात बलशाली राष्ट्र म्हणून साऱ्या  जगाचे लक्ष भारताकडे वेधल्या गेले आहे. पूर्वी विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या  लाभार्थ्यांच्या हातात शंभर रुपयांपैकी 10 रुपये पडायचे आज सर्वांच्या खात्यामध्ये त्याच्या हक्काचा पैसा पोहचतो हे सर्व मोदींजी मुळेच घडले आहे.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व अन्य मान्यवरांनी हैद्राबाद मुक्ती दिनाच्या आठवणी ताज्या करीत मोदीजींच्या कार्याचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख केला. याप्रसंगी कोरोना योध्दे, उज्वला गॅस योजनेच्या महिला लाभार्थींचा सत्कार करण्यात आला.विद्यार्थ्यांना नोटबूक चे वितरण मान्यवर अतिथींच्या शुभहस्ते करण्यात आले. श्रीराम सेवा समिती कोरपनाच्या वतीने राममंदिरात महामृत्युंजय जप करुन यावेळी  मोदीजींच्या दीर्घायुष्यासाठी  प्रार्थना करण्यात आली. या कार्यक्रमास ओम पवार, नथ्थू ढवस, संजय मुसळे, अमोल आसेकर, शशीकांत आडकीने, वासुदेव आवारी, सुनिल देरकर, मिलींद देशकर, विजय पानघाटे, प्रमोद पायघन, पाठक, दिनेश राठोड, पेटकर महाराज, सतिष मुसळे, वरभे, महादेव निवळे, बालाजी माने, बाळू जाधव, रामकिसन देवकते, विठ्ठल जाधव, गोपिनाथ चव्हाण, माधव राठोड, सुभाष पोवार, माधव निवळे, परमेश्वर बोईनवार आदि ची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button