ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवसेना (शिंदे) आणि शिवसेना (उ.बा.ठा.) पदाधिकारी यांच्यात राडा

पोलिस कर्मचाऱ्यालाही धक्काबुक्की ; दोन्ही पक्षाच्या तक्रारीवरून एकमेकांविरुद्ध गुन्हा नोंद

चांदा ब्लास्ट

        शहरातील रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत शिवसेना (शिंदे) आणि शिवसेना (उ.बा.ठा.) पदाधिकारी यांच्यात राडा झाला. शिवसेना (शिंदे) गटाच्या महिला पदाधिकारी प्रतिमा ठाकूर यांच्या मुलांना शिवसेना (उ.बा.ठा.) चे पदाधिकारी स्वप्नील काशीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केल्याने हा राडा झाला.

        दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते पोलीस स्टेशन आले असता या ठिकाणी मोठी बाचाबाची पाहवयास मिळाली. या मध्ये एका पोलिस कर्मचाऱ्यालाही धक्काबुक्की झाल्याने दोन्ही ही पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यावर पोलिसांनी रात्री उशिरा ३५३ चा गुन्हा नोंद केला.

        सोबतच क्रॉस रिपोर्ट झाल्याने दोन्ही पक्षाच्या एकमेकांविरुद्ध तक्रारी वरून ही गुन्हा नोंद करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये