चंद्रपूरचांदाब्लास्ट विशेषविदर्भ

शहरातून होणारी जड वाहतूक बंद करा

जड वाहतूक बंद न केल्यास घुग्गुस शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुरेश खडसे

घूग्घुस शहरात व परिसरात लॉयडस मेटल्स कारखाना,एसीसी सिमेंट कंपनी,कोळशाच्या खाणी व ईतर छोटे मोठे उद्योग असल्यामुळे शहरांमधून मोठया प्रमाणात या कंपनीत व कोळसा खदानीमध्ये होणाऱ्या जड वाहनांच्या वाहतुकीमुळे शहरातील प्रदूषणात वाढ झाली असुन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.तसेच जड वाहनांच्या वाहतुकीमुळे शहरातील रस्त्याची दैयनिय अवस्था झालेली असुन किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे.या जड वाहनाना उसेगाव मार्गे व कारगिल चॊकाकडून जाण्याचा रस्ता असुन ही जड वाहने पोलीस स्टेशन समोरून जातात तरी शहरा मधून होणारी जड वाहतूक बंद करण्यात यावी अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा शिवसेना घुग्गुस शाखेच्या वतीने पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे यांना निवेदनातून दिला आहे.यावेळी चंद्रपूर युवासेना तालुका प्रमुख हेमराज बावणे, घुग्गुस शहर प्रमुख सतीश बोन्डे, शिवसेना नेते बंटी घोरपडे, युवासेना शहर प्रमुख चेतन बोबडे, उपशहर प्रमुख योगेश भांदककर, निखिल मोहितकर,व शिवसेना, युवासेना कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button