चंद्रपूरचांदाब्लास्ट विशेषविदर्भ

बिबट्याच्या हल्ल्यात जखमी चौकेंना समाज कल्याण सभापती नागराज गेडाम यांनी केली आर्थिक मदत.

प्राणघातक हल्ल्यात दिलीप चौके यांना गंभीर दुखापत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत गेडाम

तालुक्यातील नलेश्वर (मोहाळी.) येथील दिलीप चौके यांना बिबट्याने घरासमोरील गोठ्यात घुसून गंभीर जखमी केल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली.
या प्राणघातक हल्ल्यात दिलीप चौके यांना गंभीर दुखापत झाली आहे.
या घटनेची माहिती जि. प. समाजकल्याण सभापती. नागराज गेडाम यांना कळताच त्यांनी दिलीप चौके यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस करत त्यांना आर्थिक मदत केली.
यासोबतच, परिसरात अशा घटना वारंवार घडत असल्याने वनविभागाने या घटनांची दखल घेऊन लवकरात लवकर सदर वाघ आणि बिबट्यांना जेरबंद करावे, अशा सूचनाही त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.
यावेळी प. स. माजी सदस्य अरविंद राऊत, पं. स.सदस्य रितेश अलमस्त, नन्नावरे, ग्रा. पं. सदस्य विठ्ठल चौके, सचिन गणविर प्रामुख्याने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button