चंद्रपूरचांदाब्लास्ट विशेषविदर्भ

अरविंन्डो कंपनीच्या संमतीसाठी बेलोरा गावकऱ्यांना अंधारात ठेवण्याचा प्रयत्न

जिल्हाधिकार्‍यांनी दिले चौकशीचे आदेश ; इंग्रजी पत्राचा वापर करून स्वाक्षरी घेण्याचा प्रकार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी अतुल कोल्हे

तालुक्यातील बेलोरा येथे अरविंन्डो कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी गावात विनापरवानगी ने इंग्रजी पत्राचा वापर करून सर्वेक्षण करून स्वाक्षरी करण्याचा प्रकार गावकऱ्यांनी हाणून पाडला . या प्रकाराने गावकऱ्यांना आधारात ठेवण्याचा प्रकार उघड झाला आहे . जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशानंतर तहसीलदारांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. बेलोरा गावाजवळील कोळसा खाणी चा ब्लॉक अरविंन्डो रियालिटी या कंपनीला मिळाला आहे याकरिता कंपनीच्या हालचाली चालू झाल्या असून कायद्यानुसार शासकीय नियमानुसार गावात प्रकल्प चालू करण्यापूर्वी संबंधित गावकऱ्यांचे भूसंपादन तसेच इतर बाबींसाठी कंपनीला संमती घेणे आवश्यकता असते मात्र कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी या शासकीय नियमाला डावलून कोणतीही सूचना न देता . गावातील ग्रामसभेची सहमती न घेता येथील गावकऱ्यांना अंधारात ठेवून कंपनीचा ब्लॉक चालू करण्यासाठी सहमती तसेच सर्वेक्षणासाठी इंग्रजी फार्म चा वापर करून गावकर यांच्या स्वाक्षऱ्या घेण्याचा प्रकार चालू केला होता हा प्रकार आकाश वानखेडे भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष व गावकऱ्यांनी हाणून पाडला हे प्रकरण पोलिस स्टेशन नंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे पोहोचले जिल्हाधिकार्‍यांनी या प्रकाराबाबत तहसीलदार महेश शितोळे यांना चौकशीचे आदेश दिले त्यांनी या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन कंपनीच्या अधिकाऱ्यांना नवीन कायद्यानुसार भूसंपादन तसेच कंपनी चालू करण्याच्या सहमति पत्र हे इंग्रजीमध्ये न देता मराठीत वापरायला पाहिजे होते तसेच गावकर्‍यांची बैठक लावून याबाबत माहिती द्यायला हवी होती मात्र शासकीय नियमांना डावलून कंपनी चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण करीत असल्याचा प्रकार उघडकीस आणून दिला अरविंन्डो कंपनीचे गावकऱ्यांनी गुमराह करण्याच्या प्रकारामुळे कंपनीच्या विरोधात रोष वाढला असून गावकरी सतर्क झाले आहे.

महेश शितोळे तहसीलदार भद्रावती.
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार या प्रकाराबाबत चौकशी करण्यात आली अरविन्डो कंपनीत कंपनी ला ब्लॉक रीतसर मिळाला मात्र कोणतीही कंपनी चालु करताना गायकऱ्यांचे अंशी टक्के सहमती असने आवश्यक आहे . शासकीय नियमांचे पालन करावे लागते त्यांनी गावकऱ्यांना विश्वासात न घेता सर्वेक्षण तसेच संमती घेण्याचा प्रकार चुकीचा असल्याचा त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात बेलोरा गावकऱ्यांची बैठक.
अरविंडो कंपनीने गावात चालू केलेला प्रकार बघता आकाश वानखेडे भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष तसेच बंडू घाडगे, गोकुळदास बुचे , तनोज पंडीले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना गावात झालेली घटना सांगितली त्यानंतर त्वरित या प्रकाराबाबत तहसीलदार भद्रावती यांना चौकशीच्या सूचना दिल्या आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button