ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देशातील ओबीसींचा भाजप हाच खरा रक्षणकर्ता – हंसराज अहीर

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर- ओबीसींच्या हिताचे कुणी कितीही दावे, प्रतिदावे केले तरी ओबीसींना खऱ्या अर्थाने सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व विविध क्षेत्रातील उन्नतीला भाजपानेच न्याय दिला आहे. जेव्हा मंडल शिफारसी स्विकारल्या गेल्या तेव्हा व्हीपींच्या सरकारसोबत भाजप होती. देशात ओबीसी आयोगाची स्थापना झाली तेव्हापासून या आयोगाला अधिकारच नव्हते प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी ओबीसींच्या हितासाठी या आयोगाला संविधानिक अधिकार बहाल केले तेव्हापासून या घटकांची प्रगती वेगाने होवू लागली आहे. त्यामुळे भाजप हाच ओबीसींचा रक्षणकर्ता व विश्वास व्यक्त करता येईल असा एकमेव राजकीय पक्ष असल्याने ओबीसी वर्गातील तमाम बांधवांनी बांधीलकीतून आपल्या न्याय हक्काकरीता भाजपासोबत यावे असे आवाहन राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी भाजपा ओबीसी मोर्चाच्या कार्यकर्ता मेळाव्यास संबोधित करतांना केले.

भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपूर महानगरच्या वतीने स्थानिक जैन भवन येथे दि. 5 ऑगस्ट रोजी आयोजित या कार्यक्रमास भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा सत्कारमुर्ती संजय गाते, प्रदेश ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी डी.डी. सोनटक्के, तामेश्वर गहाणे, प्रदेश सदस्य विजय राउत भाजपा नेते प्रमोद कडू, भाजपा जिल्हामहामंत्री ब्रिजभूषण पाझारे, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष राहूल पावडे, माजी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महानगर जिल्हाध्यक्ष अंजली घोटेकर, प्रकाश बगमारे, अनिल फुलझेले, रवि गुरनूले, रघूवीर अहीर, ओबीसी मोर्चा महानगराध्यक्ष विनोद शेरकी, राजू घरोटे, जुम्मन रिजवी, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाल, विशाल निंबाळकर, अरुण तिखे, वंदना संतोषवार, रत्नमाला भोयर, आदी पदाधिकारी, व्यासपीठावर उपस्थित होते.

आपल्या भाषणात अहीर म्हणाले की, ओबीसी आयोगाच्या माध्यमातून संविधानिक अधिकारामुळे ओबीसींना न्याय मिळत आहे. नोकरी, शिक्षण व अन्य क्षेत्रातील अन्यायाची दखल आयोगाद्वारे घेतली जात आहे. आदेशाद्वारे न्याय मिळवून देण्यात येत आहे. मोदीजींनी ओबीसींना सन्मान दिल्यानेच हे शक्य झाले आहे. आज जे ओबीसीबद्दल कळवळा दाखवित आहेत त्यांना काही करता आले नाही त्यासाठी मोदीजींचे सरकार यावे लागले. म. फुले, शाहू महाराज आरक्षणाचे पुरस्कर्ते होते. आज मुस्लिम समाजातील ओबीसी मध्ये असलेल्यांना आरक्षणाचा लाभ मिळत आहे. देशात समानतेचे वारे वाहू लागले आहेत.

त्यांनी पुढे सांगितले की नरेंद्र मोदीजींनी ओबीसींच्या सन्मानात भर घातली आहे. केंद्रात 35 टक्के ओबीसी मंत्री आहेत. जर 2007 पासून वैद्यकीय शिक्षणात ओबीसी आरक्षण लागू असते तर अखिल भारतीय कोट्यामध्ये ओबीसी प्रवर्गातील डॉक्टरांची संख्या वाढली असती केले आज वैद्यकीय शिक्षणातच नव्हे तर अन्यत्र सुध्दा ओबीसींचा टक्का वाढला आहे. केंद्र सरकारने सबका साथ सबका विकास या न्यायाने राज्यकारभार चालविल्यामुळे समाजातील प्रत्येक लोकांना त्यांचे डावलले गेलेले हक्क मिळू लागले आहेत

अनेक योजनांचा लाभ जात, धर्म, पंथाच्या पलिकडे जाऊन सर्वांना मिळत आहे हे मोदींजींच्या सर्व समावेशक धोरणांची उपलब्धी असल्याचे अहीर यांनी स्पष्ट केले यावेळी त्यांनी अनेक विषयांना स्पर्श करीत ओबीसींच्या उत्थानाकरिता सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती उपस्थितांना दिली.

ओबीसींच्या सामाजिक हक्क व उन्नतीकरीता समर्पितपणे कार्य करु- संजय गाते

ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले ओबीसींचा उत्कर्ष केवळ भाजपाच करु शकतो त्यामुळे अनेक जाती-पोटजातीमध्ये विखुरलेल्या ओबीसी बांधवांनी संघठीत होवून आपल्या न्यायाच्या लढ्यासाठी पुढे आले पाहिजे. मा. मोदीजींनी ओबीसींचा स्वाभीमान जागृत केला त्यांच्या न्याय हक्कासाठी अनेक महत्वाकांक्षी निर्णय घेतले. भाजपा महायुती सरकारने ओबीसींना अनेक बाबतीत न्याय देणारे धोरणात्मक निर्णय घेतले आहेत त्यामुळे भाजपा नेतृत्वात केंद्र व राज्यात सत्ता पुनर्स्थापित करण्यासाठी ओबीसी घटकांनी भाजपासोबत भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन केले. हंसराज अहीर संवैधानिक दर्जा लाभलेल्या ओबीसी आयोगाचे अध्यक्ष असल्याने त्यांच्या कारकिर्दीत ओबीसी बांधवांना न्याय मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. भाजप श्रेष्ठींनी सोपविलेल्या जबाबदारीला न्याय देण्यासाठी आपण ओबीसीचे संघठन मजबूत करु समाजातील प्रत्येक घटकांना न्याय देण्याकरिता पदाचा वापर करण्याची ग्वाहीसुध्दा संजय गाते यांनी उपस्थित ओबीसी बांधवांना दिली.

प्रारंभी ओबीसी मोर्चाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांचा हंसराज अहीर व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नवनियुक्त भाजप पदाधिकारी मान्यवर अतिथी व ओबीसी प्रवर्गातील अनेक समाज बांधवांचा उपस्थितांनी सन्मान केला. या प्रसंगी अन्य मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन शशिकांत मस्के यांनी तर पाहूण्यांचे आभार विनोद शेरकी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदीप किरमे, शैलेश इंगोल, सुभाष आदमने, पराग मलोडे, मुग्धा खांडे, सचिन संदूरकर, सुभाष ढवस, सुधाकर बोंडे, दिपक झोरे, मधुकर राऊत, राम हरणे, शाम बोबडे, शालू कनोजवार, संगिता सुर्यवंशी, मोनीका महातव, मयुर भोकरे, अरुणा चौधरी यांचे सह अनेकांनी परिश्रम घेतले कार्यक्रमास चंद्रपूरसह जिल्हातील बहूसंख्य ओबीसी बंधू भगिनी व भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये