चांदाब्लास्ट विशेष

शेतकऱ्याला विहित मुदतीत अभिलेख पुरवण्यास टाळाटाळ

शेतकरी खामनकर यांनी जिल्हाधिकारी चयांचा कडे केली तक्रार.

चांदा ब्लास्ट:: प्रमोद गिरटकर कोरपना

कोरपना – शेतजमीन वर्ग एक करण्याकरता शेतकऱ्यांकडून मागवण्यात आलेल्या, अभिलेखास विहित मुदतीत देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अभिलेखागार, तहसील कार्यालय कोरपना ची तक्रार जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना करण्यात आली आहे.
मौजा माथा येथील शेतकरी राजेश गजानन खामनकर यांनी शेत जमीन वर्ग-एक करण्याकरता सन १९६१ – ६२ मधील माजी न ८९ चा सातबारा, १९६६ -६७ मधील सर्वे नंबर १२३/१ व १२३/२ चा सातबारा , सन १९६१ – ६२ सर्वे नंबर ८९ अ चा सातबारा ,१९७५-७६ सर्वे नंबर १२६/१ चा सातबारा, फेरफार क्रमांक ७५,२९२ , २२४ , २९४ व ९९ च्या फेरफार पंज्या च्या अभिलेखाच्या प्रती मिळण्याकरता अभिलेखागार तहसील कार्यालय कोरपना येथे १ सप्टेंबर रोजी विहित नमुन्यात अर्ज केला. १४ सप्टेंबरला कार्यालयात जाऊन त्यांनी अर्जावरील अभिलेख मिळण्या बाबत विचारणा केली असता, चार दिवसांनी या असे उत्तर देत अभिलेख पुरवण्यास टाळाटाळ केली. नियमाप्रमाणे सात दिवसाच्या आत अर्जावरील माहिती देणे बंधनकारक असताना. चौदा दिवस उलटूनही माहिती देण्यात आलेली नाही. या अनुषंगाने कामात हयगय करणाऱ्या अभिलेखागाराची चौकशी करून कारवाई करण्यात यावी व कार्यालयाच्या दर्शनी भागात अभिलेख पुरवण्याबाबत किती दिवसाचा कालावधी लागेल. व त्याची प्रति नक्कल फी चा माहितीचा फलक लावण्यात यावा अशी मागणी शेतकरी खामनकर यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना दिलेल्या तक्रारीत केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button