आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रसन्मान कर्तव्याचा

सुधीर लक्ष्मण आत्राम गोंडवाना विद्यापीठाच्या जनसंवाद विभागातून प्रथम

दीक्षांत समारंभात मान्यवरांच्या हस्ते पदवी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित

चांदा ब्लास्ट

– सरदार पटेल महाविद्यालयाच्या जनसंवाद विभागाचा विद्यार्थी सुधीर लक्ष्मण आत्राम हा गोंडवाना विद्यापीठाच्या एम. ए.(मास कम्युनिकेशन) या विषयात गुणवत्ता यादीत विद्यापीठातून प्रथम आला आहे. त्याला नुकतेच दीक्षांत समारंभात सन्मानित करण्यात आले.

गोंडवाना विद्यापीठाचा 10वा दीक्षांत समारंभ राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात पार पडला. या कार्यक्रमाप्रसंगी राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय महामार्ग व रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत, कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्यासह प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.

चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयातील विद्यार्थी सुधीर लक्ष्मण आत्राम गोंडवाना विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाच्या एम. ए.(मास कम्युनिकेशन) या अभ्यासक्रमात विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत (10 पैकी 9.59) प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पदवी व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

या यशाबद्धल सुधीर आत्राम याने सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सुधाताई पोटदुखे, कार्याध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित व इतर पदाधिकारी,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एम.काटकर यांच्यासह उपप्राचार्य डॉ स्वप्नील माधमशेट्टीवार, जनसंवाद विभागप्रमुख डॉ. पंकज मोहरीर, प्रा.संजय रामगिरवार, प्रा.अरविंद खोब्रागडे यांच्यासह सहकार्य करणारे सर्व प्राध्यापकांचे आभार व्यक्त केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये