चंद्रपूरचांदाब्लास्ट विशेषविदर्भ

पेट्रोल पंप हटाव कृती समितीने जिल्ह्यात चालू केले तीव्र आंदोलन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ चालू करण्यात आलेल्या साखळी उपोषणकर्त्या महिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी अविनाश नागदेवें

 

वर्धा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोलिस प्रशासनाच्यावतीने पेट्रोल पंपाचे काम चालू करण्यात आले तो पेट्रोल पंप इतरत्र हलवा या मागणीसाठी महिनाभ-यापासून जिल्ह्यात ठिक ठिकाणी आंदोलन चालू आहे तरीही या पेट्रोल पंपाचे काम चालू आहे त्यामुळे पेट्रोल पंप हटाव कृतीच्या समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत

आज सामाजिक कार्यकर्त्यां शारदाताई झांबरे रत्नमाला साखरे नंदा कुसळे कुसुम मानकर सरिता टेंभुरकर या उपोषणाला बसल्या होत्या काही वेळानंतरच पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले हे उपोषण रोज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ चालू राहील अशी माहिती शारदाताई झामरे यांनी दिली येथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला पेट्रोल पंप हटाव

कृती समितीला वर्धा जिल्हा भाजपाने पाठिंबा दिला आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील पेट्रोल पंप हटविण्यात यावा या मागणीसाठी विविध सामाजिक परिवर्तनवादी राजकीय संघटना जिल्ह्यात एकत्र आल्या आहे आजपासून जिल्ह्यात हे आंदोलन तीव्र होत आहे मात्र प्रशासन या आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत आहे उद्या हिंगणघाट येथे पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्यावतीने भव्य जनआक़ोश मोर्चा काढण्यात येणार आहे हे आंदोलन जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात पोहोचले असून वर्धा येथे झालेल्या जन आक़ोश मोर्चात जिल्ह्यात खेड्या पाड्यातील सुमारे १० हजाराच्यावर नागरिक सहभागी झाले होते हा पेट्रोल पंप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून इतरत्र हलवा ही आंदोलन कर्त्याची मागणी आहे अनेकदा धरणे आंदोलन

 

करण्यात आले परंतु काहीच न झाल्याने आजपासून पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ साखळी उपोषण चालू केले आहे आज पोलिसांनी उपोषणकर्त्या महिलांना ताब्यात घेतले तरीही उद्या पुन्हा याच ठिकाणी आंदोलन करण्यात येईल हे आंदोलन पेट्रोल पंप हटवत पर्यंत चालू राहील अशी माहिती आंदोलन कर्त्यानी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button