ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भिमनगर दुर्गापूरात मुदिता प्रबोधन उत्सव

चांदा ब्लास्ट

भारत देशाच्या गौरवशाली बौध्द सभ्यतेमध्ये पौर्णिमेचा चंद्र आणि बुध्द यांचं अटूट नातं प्रस्थापित झालं आहे. बुध्दाने प्रत्येक पूर्णिमेला मानवी कल्याणाचा धम्मउपदेश केला आहे. त्यामुळे पूर्णिमेचा चंद्र हा बौध्द सभ्यतेचा नैसर्गीक अलंकार म्हणून सुशोभित झाला आहे.

            बुध्दप्रतिपादीत मेत्ता, करूणा, मुदिता व उपेक्खा या मनाच्या चार श्रेष्ठ ध्यान भावना मानवी मनोभूमित यतार्थपणे रूजाव्यात या करीता बुध्दवर्षातील मार्गशिर्ष, पौष, माघ व फाल्गूण या चार महिण्यांच्या पूर्णिमांना त्या प्रतिकात्मकरीता प्रस्थापित केल्या आहेत. यानुसार बौध्द सभ्यतेची मार्गदर्शिका बुध्दसासनं दिनदर्शिकेनुसार बौध्दांची मुदिता पुण्णमा अर्थात माघ पूर्णिमा शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी 2024 अर्थात जुण्ह 15 माघ 2568 बुध्दवर्ष रोजी येत आहे.

            धम्मदायाद मेत्ता संघ तथा धम्म प्रसार समिती दुर्गापूरच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 24 फेब्रुवारीला सायंकाळी 7.00 वाजता भिमनगर वार्ड क.4 दुर्गापूर येथील पंचशिल बुध्दविहारात माघ पूर्णिमा-मुदिता प्रबोधन उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रबोधन उत्सवात 1) गृहस्थांचा विनय – मंगल सुत्त 2) मुदिता भावनेचे सारतत्व आणि 3) बौध्दसभ्यता प्रसारार्थ बुध्दसासनं दिनदर्शिकेची भूमिका या महत्त्वपूर्ण विषयांवर धम्म प्रबोधन प्रस्तूत होणार आहे. सदर धम्म उत्सवात दुर्गापूर तथा उर्जानगर परिसरातील धम्म श्रावकांनी मोठया संख्येनी उपस्थित राहून प्रबोधनाचा लाभ घ्यावा असे रमाई महिला मंडळाच्या भाविकाताई मेश्राम, आम्रपाली लोहवे, रविनाताई मेश्राम तथा विहार कमीटीचे पंकज वाघमारे आणि निखील खंडारे यांनी एका संयुक्त पत्रकाद्वारे नम्र निवेदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये