Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

युवासेना कॉलेज चेंबरच्या लोकसभा अध्यक्षपदी चेतन बोबडे यांची नियुक्ती.

चांदा ब्लास्ट

  मुंबई : चंद्रपूर, वणी आणि आर्णी लोकसभा मतदारसंघासाठी युवासेना कॉलेज चेंबरच्या लोकसभा अध्यक्षपदी अभियंता चेतन देवराव बोबडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटन मजबूत करून सक्रिय राजकारणात तरुणांना सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने युवासेनेच्या नेतृत्वाने ही नियुक्ती केली आहे.

 चेतन बोबडे हा तरुण आणि उत्साही नेता म्हणून ओळखला जातो. त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे ते विद्यार्थी आणि तरुणांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे युवासेनेचे कार्यकर्ते व समर्थकांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.

 चेतन बोबडे यांनी आपल्या नियुक्तीबद्दल युवासेनेच्या ज्येष्ठ नेत्यांचे आभार व्यक्त करत युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी व संघटन मजबूत करण्यासाठी पूर्ण निष्ठेने काम करू अशी ग्वाही दिली.

 प्रदेशातील युवा सेनेची सक्रियता आणखी वाढवण्याच्या दिशेने ही नियुक्ती एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये