बोगस बियाणे प्रकरणात उत्कृष्ठ कामगिरी बद्यल पोलीस अधिक्षक यांचे कडुन पोलीस अंमलदार यांचा सत्कार
नमुद अवैध व्यवसायाबाबत तात्काळ वरीष्ठांना दिली होती माहिती
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
कार्यवाहीअंती सदर ठिकाणावरुन 1 करोड 55 लाख 83 हजार 970/- रु चा मुद्देमाल जप्त झाला होता
पोलीस अधिक्षक कार्यालय, वर्धा येथे कार्यरत असलेले नापोशी / 1289 अतुल वैद्य यांना दिनांक 12/06/2023 रोजी गोपनिय माहिती मिळाली की, मौजा म्हसाळा येथील एका घरात बोगस कपासीचे बियाणे पॅकींगचा अवैध व्यवसाय सुरु आहे. याबाबत नमुद अंमलदार यांना सदर अवैध व्यवसाय करणारे मुख्य आरोपीने या अवैध व्यवसाया ची माहिती उघड न करने करीता व कार्यवाही न करने करीता मोठ्या रकमेच्या लाचेचे प्रलोभन सुध्दा दिले होते. परंतु सदर अंमलदार यांनी लाचेचे प्रलोभनाला बळी न पडता उपरोक्त नमुद अवैध व्यवसाया बाबत तात्काळ वरीष्ठांना माहिती दिली होती. सदर अंमलदार यांनी दिलेल्या माहिती वरुन पो.स्टे. सेवाग्राम व स्थानिक गुन्हे शाखेने कार्यवाही केली असता नमुद ठिकाणी बोगस कपासीचे बियाणे पॅकींगचा अवैध व्यवसाय सुरु असल्याचे निष्पन्न झाले. कार्यवाहीअंती सदर ठिकाणावरुन 1,55,83,970/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन पो.स्टे. सेवाग्राम येथे अप.क्र. 346/ 23 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मा. पोलीस अधिक्षक, वर्धा यांचे निर्देशावरुन करण्यात आलेल्या या कार्यवाहीतुन कपासीचे बोगस बियाणाचे मोठे रॅकेट वर्धा पोलीसांनी उघड केले असुन यामुळे शेकडो शेतकऱ्यांचा बोगस कपासीचे बियाण्यामुळे होणारी फसवणुक व आर्थीक नुकसाना पासुन बचाव होणेस मदत झाली आहे.
नापोशी / 1289 अतुल वैद्य यांनी केलेल्या उपरोक्त नमुद कामगिरी मुळे मा. पोलीस अधिक्षक, वर्धा यांनी प्रशंसापत्र व 10,000/- रुपयाचे रिवार्ड देवुन त्यांचा गौरव केला आहे. कपासीचे बोगस बियाणाचे रॅकेट उघडकिस आणल्यामुळे मा. पोलीस अधिक्षक, वर्धा श्री नूरुल हसन यांचे नेतृत्वात वर्धा पोलीसांचे शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.