समर्थ फार्मसीचे प्रा.देवानंद डोंगरे नॅशनल एक्सलन्स अवॉर्डने सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
श्री गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्था संचलित समर्थ औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक देवानंद डोंगरे यांना नॅशनल एक्सलन्स अँचिवर अवॉर्ड 2025 ने सन्मानित करण्यात आले.नॅशनल रिसर्च एक्सलन्स अवार्ड 2025 हा भारतातील राष्ट्रीय शिक्षक कार्यामध्ये ज्या लोकांनी उल्लेखनीय काम केले अशा लोकांना दिला जातो.
त्यामधून समर्थ औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयातील प्रा. डोंगरे यांची निवड झाली आहे. ही एक अत्यंत अभिमानाची बाब आहे.याद्वारे महाविद्यालयाच्या शिरपेच्यात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला, शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असे ज्ञान दानाचे कार्य केल्याबद्दल भारत भरातून निवडक अश्या काही लोकांनाच हा अवॉर्ड दिला जातो. समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी च्या प्रा. डोंगरे यांच्या कार्याबद्दल या पुरस्काराने सन्मानित केल्या गेले. महाविद्यालयाच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची उपलब्धता आहे.
या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती नंदाताई कायंदे,सचिव सतीश भाऊ कायंदे, सहसचिव आमदार मनोज भाऊ कायंदे,प्राचार्य डॉ. पी. आर. ताठे, उपप्राचार्य डॉ. जी. आर. सीताफळे, डॉ.पी. आर लड्डा, प्रा. के. बी. चराटे यांनी भरभरून कौतुक केले व अवार्ड ने सन्मानित झाल्याबद्दल शाल व पुष्पगुच्छ देऊन संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला, व उत्तोरोउत्तर अशीच प्रगती करा, या शब्दा मध्ये पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.