अवैद्य रेतीवर कार्यवाही ; १३ लाखावर मुद्येमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
नमुद घटना ता. वेळी व ठिकाणी दिनांक 05.06.2025 रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक, उपविभाग पुलगांव श्री. राहुल चव्हाण, यांना मुखबीर द्वारे गोपनिय माहीती प्राप्त झाली की, पोलीस स्टेशन देवळी हद्दीत काही इसम वर्धा नदी पात्रातील रोहनी घाटातुन अवैद्यरित्या रेती ची उपसा करून वाहतुक करीत आहे. त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक, सुधिर बनकर सोबत सफौ. दिपक जाघव, ब.नं. 1116, पोलीस शिपाई संदीप बोरबन, ब.नं. 635, शिपाई उमेश बेले, ब.नं. 180, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, उपविभाग पुलगांव यांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता पोलीस आल्याची चाहुल लागल्याने ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. 32/एस. 7179 ट्राली सह व दुसरा ट्रॅक्टर ज्याला क्रमांक नसलेला व रेती काढण्याचे यंत्रा चे चालक मालक हे पसार झाले, सदर ठिकाणी पोलीस पाटील, अपर तहसीलदार, पुलगांव यांचे उपस्थितीत घटनास्थळा वरून 13,00,000/- रू. मुद्येमाल जप्त करून अज्ञात 04 आरोपी विरूध्द गुन्हा नोंद करून कायदेषीर कार्यवाही करण्यात आली आहे.
प्रकरण असे आहे की, घटना ता. वेळी व ठिकाणी दिनांक 04.06.2025 रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक, उपविभाग पुलगांव श्री. राहुल ल. चव्हाण, यांना मुखबीर द्वारे गोपनिय माहीती प्राप्त झाली की, पोलीस स्टेषन देवळी हद्दीत काही इसम वर्धा नदी पात्रातील रोहनी घाटातुन अवैद्यरित्या रेती ची उपसा करून वाहतुक करीत आहे.
त्या अनुशंगाने आमचे मार्गदषनात पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी छापा टाकुन ट्रॅक्टर ट्राली व रेती काढण्याचे यंत्र किंमत 13,00,000/- रू चा मुद्येमाल जप्त करून अज्ञात 04 आरोपी विरूध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे.