चांदाब्लास्ट विशेष

वृत्तपत्र विक्रेता राजू किर्तीवार काळाच्या पडद्याआड

मूल(चिरोली) येथील राजेश न्यूज पेपर एजन्सीचे संचालक होते

चांदा ब्लास्ट:प्रमोद मशाखेत्रे

मूल :- चिरोली येथील राजेश न्यूज पेपर एजन्सीचे संचालक ,जनसामान्यात अत्यंत लोकप्रिय असलेले वृत्तपत्र विक्रेता राजेश (राजू) सुधाकर किर्तीवार यांचे आज रविवार दिनांक 01/08/2021 ला पहाटे 2.00 च्या दरम्यान चंद्रपूर येथे उपचारादरम्यान आकस्मिक निधन झाले. मृत्यूसमयी ते 46 वर्षाचे होते. ते मूल येथील प्रगती नागरी सहकारी पतसंस्थेचे दैनिक अभिकर्ता म्हणून काम करीत होते.
ते शांत, सुस्वभावी, कर्तबगार व्यक्तिमत्वाचे धनी होते .त्यांच्या काळाच्या पडद्याआड जाण्याने सर्वत्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्यावर चिरोली येथील अंधारी नदीच्या तीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले.अंत्यसंस्काराला नातेवाईक, मित्रमंडळी व मोठ्या प्रमाणात चिरोली परिसरातील नागरिक उपस्थित होते. त्यांच्या पश्चात आईवडील, पत्नी ,मुलगा व आप्तपरिवार आहे.कुटुंबाचा पालनकर्ताच काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button