चांदाब्लास्ट विशेषविदर्भ

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाचे भूमिपुजण संपन्न

मा.अध्यक्ष अतुलजी तराळे यांच्या हस्ते हारार्पण करुन अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक ०१ ऑगस्ट २०२१ रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्य प्रभाग क्र ३ मधिल लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला मा.अध्यक्ष अतुलजी तराळे यांच्या हस्ते हारार्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच वर्धा नगर परिषद कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला हारार्पन करण्यात आले.

या जयंतीचे औचित्य साधून प्रभाग क्र ५ मधिल सिव्हील लाईन पाण्याची टाकीजवळ जुन्या न,प इमारतिच्या आवारात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा भूमिपुजण सोहळा पार पडला या प्रसंगी मा.खासदार रामदासजी तडस यांच्या शुभहस्ते भूमिपुजण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्धा नगर परिषद अध्यक्ष अतुलजी तराळे होते. तसेच या कार्यक्रमाला प्रदिपसिंग ठाकूर उपाध्यक्ष न.प.वर्धा प्रभाग क्र ५ चे नगर सेवक रविंद्र उर्फ बंटीभाऊ गोसावी, नगरसेविका श्रीमती अर्चना ताई आगे, श्रीमती शुभांगीताई कोलते पाणी पुरवठा सभापती,नगरसेविका श्रीमती रंजनाताई पट्टेवार, नगरसेविका श्रीमती गुंजनताई मिसाळ, नगरसेविका श्रीमती राखीताई पांडे, नगरसेवक कैलासजी राखडे. नगरसेवक निलेशजी किटे, नगरसेवक सुरेश आहुजा, नगरसेवक विजय उईके,नगरसेवक जयंताभाऊ सालोडकर,निलेशजी खोंड गटनेता, तसेच सर्व सभापती व नगरसेवक यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी फकीराजी खडसे, अशोकराव डोंगरे. राजकुमार जाधव, गंगाबाई चव्हाण, सतिश गवळी, सुरेश चव्हाण,विलास डोंगरे,सुमणताई बावणे, गणेश मुंगले, महादेवराव तेलंग, संगिता वानखेडे,चेतना कांबळे,रवि खंडारे,नामदेव शिखरे, दिनेश प्रधान, नितेश कांबळे, प्रतिभा जाधव, अनिल डोंगरे, उमेश कांबळे,अक्षय कांबळे, विकास काळे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button