ताज्या घडामोडी

वेदनेवर फुंकर घालून हास्य निर्माण करणारं साहित्य तयार व्हावे – डाँ विकास आमटे

झाडी शब्दसाधक पुरस्कार वितरण व पुस्तक प्रकाशन सोहळा

चांदा ब्लास्ट :

अतुल कोल्हे भद्रावती :-
जगातील वंचितांच्या व दुःखीतांच्या वेदनेवर जेव्हा साहित्यातून फुंकर घालून चेह-यावर आनंद निर्माण होईल तेव्हाच साहित्तिकाला समाधान वाटले पाहिजे,असे साहित्य तयार साहित्तिकांच्या लेखणीतून उतरले पाहिजे असे प्रांजळ मत कार्यक्रमाचे उद्घाटक मा.डाँ विकास आमटे यांनी काढले.

झाडीबोली साहित्य मंडळ,चंद्रपूर व वरोरा शाखेतर्फे आयोजीत असलेला झाडी शब्दसाधक पुरस्कार वितरण,पुस्तक प्रकाशन व पुस्तक लोकार्पण सोहळा निजबल इमारत संधी निकेतन आनंदवन वरोरा येथे हा देखणा,नेत्रदीपक सोहळा दिग्गज मान्यवर व जिल्हाभरातील साहित्तिकांच्या भरगच्च उपस्थितीत थाटात पार पडला.
याप्रसंगी सन्मा.डाँ.विकास आमटे उद्घाटक,विशेष अतिथी मा.पद्मश्री डाँ.परशुराम खुणे नाट्यकलावंत,कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.बंडोपंत बोढेकर ,मा.आचार्य ना.गो.थुटे,मा.सुधाकर कडू,मा.रत्नमालाताई भोयर,मा.अरुण झगडकर जिल्हाध्यक्ष,मा.पंडीत लोंढे अध्यक्ष ह्या मान्यवर उपस्थित होते.झाडीबोली वरोरा तर्फे मान्यवरांचा सत्कार सन्मानचिन्हासह करण्यात आला.

ह्या प्रसंगी सु.वि.साठे लिखित “गीतांगण” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन तर “बंध सबंध” या ना.गो.थुटे लिखित काव्यसंग्रहाचे लोकार्पण पार पडले.भाष्यकार म्हणून भाष्य मा.मदनराव ठेंगणे व मा.सुभाष उसेवार यांनी आपल्या सुक्ष्म परिक्षणातून भाष्य केले.जिल्ह्यातील १६ साहित्य व समाजकार्य विश्वात काम करणा-या साहित्तिकांचा सन्मान करण्यात आला त्यात “झाडी विशेष गौरव पुरस्कार” आनंदवनचे दिव्यांग साहित्तिक रमेश बोपचे झाडी शब्द साधक पुरस्कार देऊन प्रा. नामदेव मोरे (चंद्रपूर),प्रकाश कोडापे(चिमूर ),जयंत लेंजे(सिंदेवाही),शितल कर्णेवार(राजुरा),सुनील बावणे (बल्लारपूर),मंगला गोंगले(सावली),वृंदा पगडपल्लीवार (मुल),डॉ.अर्चना जुनघरे (जिवती),सुजित हुलके(पोंभुर्णा) ,संगीता बांबोळे (गोंडपिपरी),धनंजय पोटे (ब्रह्मपुरी),महादेव हुलके (कोरपना),वंदना बोढे (भद्रावती),विजय भसारकर (वरोरा) इत्यादींना सन्मानित करण्यात आले तर रमेश बोपचे (आनंदवन), विनोद देशमुख (घाटकुळ), संतोष मेश्राम (ब्रम्हपुरी) यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले तर संधीनिकेतनचे अधिक्षक रवींद्र नलगिंटवार , माधव कौरासे यांचा त्यांच्या वाढदिवसासह व सेवाकार्याबद्दल सत्कार करण्यात आला. या सर्व पुरस्कार घोषित मान्यवरांचा सन्मान,आनंदवन निर्मित शाल,पुष्पपात्र सन्मान चिन्ह,प्रमाणपत्र यासह करण्यात आला. आनंदवन संधी निकेतन अधिक्षक रविद्र नलगिंटवार यांचे तर्फे पद्मश्री डाँ.परशुराम खुणे यांचा सत्कार सन्मान करण्यात आला,शाखेचे ज्येष्ठ सदस्य माधव कौरासे सर यांचा वाढदिवसप्रसंगी शाखेतर्फे सन्मान करण्यात आला.
वरोरा झाडीबोली शाखेने ह्या नेत्रदिपक सोहळ्याचे यशस्वितेसाठी आनंदवन येथील संधी निकेतन चे अधिक्षक तथा मंडळाचे मा.रविंद्र नलगिंटवार, दीपक शिव,रमेश बोपचे,अश्विनी मँडम,मुकेश पिंपरे यांच्यासह मंडळाचे सर्व सदस्याचे अथक परिश्रमातून, सहकार्यातून हा सोहळा संपन्न झाला.या सोहळ्याला आनंदवन परिवाराकडून उपहाराची व चहापानाची व्यवस्था झाली तर गोड जिलेबीची व्यवस्था माधव कौरासे सर यांचेकडून सहयोग मिळाला.
ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंडीत लोंढे अध्यक्ष यांनी,सुत्रसंचलन दीपक शिव व चंद्रशेखर कानकाटे यांनी तर आभारप्रदर्शन सौ.भारती लखमापुरे यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये