चंद्रपूरचांदाब्लास्ट विशेषविदर्भ

थोर पुरुषांचे विचार प्रेरणा देणारे – रविंद्र गुरनुले

लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर शहरातील डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला त्या प्रसंगी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर महामंत्री रविंद्र गुरनुले यांनी विचार व्यक्त करतांना सांगितले की थोर पुरुषांचे विचार हे प्रेरणा देणारे असून लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना त्यांनी दिली व यामुळे लोकांमध्ये स्वातंत्र्य मिळविण्यासाठी नवचैतन्य निर्माण झाले.लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी कथा व कादंबरीच्या माध्यमातून स्वातंत्र्य पूर्व काळात व स्वातंत्र्य नंतर त्यांनी मोठी जनजागृती केली या दोन्ही थोर पुरुषांचे विचार हे प्रेरणा देणारे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले सदर अभिवादन कार्यक्रमा नंतर आ.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रोगनिदान शिबीर साप्ताह अंतर्गत नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टी वैदकिय आघाडी महानगर चंद्रपूर अध्यक्ष डॉ.किरण देशपांडे,रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ.प्रमोद बांगडे,सचिव अमोल पोटूडे,भाजपा सचिव संदीप देशपांडे,मंडळ अध्यक्ष रवी लोणकर,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयतील डॉ.शुभम अग्रहरी,संदीप महाजन,घनश्याम माहुरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button