चंद्रपूरचांदाब्लास्ट विशेषविदर्भ

शेतीच्या वादातून केली मोठ्या भावाने लहान भावास मारहाण

लोखंडी रॉड ने केली मारहाण ; इसम गंभीर जखमी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

तालुक्यातील घोटनिंबाळा येथे शेती हिस्से वाटनीच्या वादात घरगुती भांडणातुन निर्माण झाल्या वादाने मोठ्या भावाने लहान भावास लोखंडी रॉड मारून गंभीर जखमी केले.
ही घटना आज दि. ३१ जुलै सका. ८.३० ला घडली असुन अनिल संभाजी जीवतोडे वय ४३ वर्षे असे जखमी इसमाचे नाव आहे. ते काही दिवसा पूर्वीच सैन्यदलातुन सेवानिवृत्त झाले. नामदेव संभाजी जिवतोडे, मीरा नामदेव जिवतोडे, मयूर नामदेव जिवतोडे व सुमित हनुमान जिवतोडे यांनी मिडून अनिल संभाजी जिवतोडे याना मारहाण करून गंभीर जखमी केल्याची खडबडजनक घटना घोट निंबाळा येथे घडली आहे.
प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील घोटनिंबाळा येथे दि ३१ जुलै सकाळी ८ वा च्या सुमारास अनिल संभाजी जिवतोडे हे आप लय शेतात ट्रॅक्टर ने चिखलकाम करीत होते. शेतीच्या वादावरून त्यांचा मोठा भाऊ हा वडिलांसोबत घरगुती वाद निर्माण करून भांडणतंटा करीत असल्याची माहिती त्यांच्या पत्नीने अनिल जिवतोडे याना शेतात येऊन दिली. ते सर्व काम सोडून शेतातून पांदण रस्त्याने घरी येत असताना नामदेव संभाजी जिवतोडे व त्याचे सोबत मीरा नामदेव जिवतोडे, मयूर नामदेव जिवतोडे, सुमित हनुमान जिवतोडे हे चारचाकी वाहनाने येऊन अनिल संभाजी जिवतोडे यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने व त्यांच्या हातावर आणि पायावर लाकडी दांड्याने मारून त्यांना गंभीर जखमी केले. आणि सोबतच त्यांच्या पत्नील सुद्धा मारहाण केली. मायदेशी परतलेला वीर जवान अनिल संभाजी जिवतोडे हा जखमी रुपात आपले चारचाकी वाहन चालवत पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली असून त्यांना जिल्हा ग्रामीण रुग्णालय चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी सदर घटनेचे गांभीर्य घेत कलम 324, 506 नुसार सदर चारही आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button