चंद्रपूरचांदाब्लास्ट विशेषविदर्भ

नागभिड येथील शिव टेकडी येथे पिण्याचे पाणी व शौचालयाची सोय करा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वतीने निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

नागभिड येथील शिव टेकडी येथे महाशिवरात्रीचे वेळी मोठी जत्रा भरते. मात्र श्रावण शुद्ध पंचमी महिन्यात शिव टेकडी येथे निसर्ग निर्मित परिसर व मारणींग वॉक संघटनेने शिव मूर्तीची स्थापना करून वेगळं स्थान प्राप्त करून दिले. मात्र या ठिकाणी दररोज सकाळी व सायंकाळी फिरणाऱ्यासाठी आल्हाद दायक शुद्ध वातावरण पसरले असते. मात्र त्या ठिकाणी शौचालय व पिण्याचे पाणी नसल्याने या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांना काही वेळा आवश्यक सोईच साधन असावे याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने नगर परिषद नागभिड येथील मुख्याधिकारी चव्हाण मॅडम यांना निवेदन देऊन शिव टेकडी परिसरात पिण्याचे पाणी व स्वच्छता, शौचालय सुरू करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वतीने शहर अध्यक्ष रियाज शेख, युवक शहर अध्यक्ष शारुख शेख, सुरेश ढोले,चंद्रशेखर नारायणे,सूरज बैस, शहील शेख उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button