चंद्रपूरचांदाब्लास्ट विशेषविदर्भ

चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष मजहर अली, आदीसह बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथि व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात आज 1 ऑगस्ट ला पार पडला. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष मजहर अली, सचिव बाळू रामटेके, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष बाळभैया हूनगूंद उपस्थित होते. यावेळी उपस्थित पत्रकारांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आशिष अंबाडे, प्रवीण बतकी, निलेश डहाट, जितेंद्र मशारकर, योगेश चिंधालोरे, राजेश नायडू, रोशन वाकड़े, कमलेश सातपुते, सुशील नगराळे, संजय नंदुरकर, गौरव पराते, चिन्ना बामानिटी, राममिलन सोनकर, धनंजय साखरकर आदीसह बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पंकज मोहरीर यांनी केले. आभार देवानंद साखरकर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button