चंद्रपूरताज्या बातम्यामहाराष्ट्र

दोन दिवसीय शिबिरात १८५ जणांना बसविण्यात आले ‘मॉड्युलर कृत्रिम अवयव’

जिल्ह्यातील दिव्यांगांना कृत्रिम अवयव देण्याचा पंजाबी सेवा समितीचा नेहमीच प्रयत्न

चांदा ब्लास्ट

पंजाबी समाज सेवा समितीच्या विनंतीवरून नारायण सेवा संस्थान उदयपूरच्या डॉक्टर्स व त्यांच्या टीमने दि. १६ आणि १७ ऑगस्ट रोजी दोन दिवसीय शिबिरात १८५ गरजूंना हात-पाय मोफत दिले. गरजू दिव्यांगांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून अनुक्रमांक आधीच दिला होता.

      त्यांच्याच जिल्ह्यातील दिव्यांगांना अतिशय उत्तम दर्जाचे कृत्रिम अवयव देण्याचा पंजाबी सेवा समितीचा नेहमीच प्रयत्न असतो. समितीचे अध्यक्ष विपीन कपूर म्हणाले की, आमच्या जिल्ह्यातील आणि आसपासच्या गरजूंना मोफत सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही असेच प्रयत्न करत राहू.  पंजाबी सेवा समितीच्या मदतीने १८५ गरजू लोकांना पंजाबी सेवा समिती भवन, कबीर नगर येथे मॉड्युलर हात-पाय बसवता आले. ज्यामध्ये लहान मुले, मुली, तरुण, महिला आणि वृद्धांसह सर्व वयोगटातील लोकांचा समावेश आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष अजय (विपिन) कपूर, माजी अध्यक्ष किशनकुमार चड्डा, माजी अध्यक्ष कुक्कू साहनी, मिंटू चड्डा, स्वामी आनंद देव, अशोक सुरी, सुरेश शर्मा, राजेश खोसला, देवेंद्र नारंग, हिरा सिंग, पूरण सिंग, पतंजली, डॉ. केंद्र के शरद व्यास, विजय चंदवार, सुधाकर, पूनम कपूर, सोनम कपूर, सौरभ कपूर, नीलेश पाजाडे, मुन्ना खोब्रागडे आदी मान्यवरांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button