चंद्रपूरताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या पार्श्वभूमीवर कलम १४४ लागू

परीक्षा उपकेंद्राच्या १०० मीटर क्षेत्रांतर्गत झेरॉक्स, मोबाईल फोन, इंटरनेट किंवा इतर कोणतेही कम्युनिकेशन सवलतींना प्रतिबंध

चांदा ब्लास्ट

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परिक्षा-२०२२ चंद्रपूर मुख्यालयाच्या ठिकाणी दि. २१ ऑगस्ट २०२२  रोजी सकाळी १० ते १२ व दुपारी ३ ते ५ या कालावधीत एकुण ०८ उपकेंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे उपकेंद्राच्या ठिकाणी परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत  परीक्षा उपकेंद्राच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंध करण्यासाठी कलम १४४  लागू करण्यात आले आहे, याविषयीचा आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमीत केला आहे.

दि. २१ ऑगस्ट २०२२  रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची  राज्यसेवा  पुर्व  परीक्षा २०२२ परिक्षा उपकेंद्राच्या ठिकाणी सकाळी ७  ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत परीक्षा उपकेंद्राच्या  १०० मीटर परिसरांतर्गत परीक्षार्थी व्यतिरिक्त २ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित जमा होणार नाही. सदर परिक्षा उपकेंद्राच्या १०० मीटर परिसर व क्षेत्रांतर्गत सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत नियमित व रोजचे वाहतूकी व्यतिरिक्त इतर हालचालींना प्रतिबंध राहील. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परिक्षा-२०२२ मधील परीक्षा उपकेंद्राच्या १०० मीटर क्षेत्रांतर्गत परीक्षेदरम्यान झेरॉक्स, फॅक्स, एस.टी.डी.बुथ, पेजर, मोबाईल फोन, ई-मेल, इंटरनेट सवलती किंवा इतर कोणतेही कम्युनिकेशन सवलतींना प्रतिबंध राहील.

या परीक्षा उपकेंद्रांना लागू राहील आदेश:

विद्या विहार हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय तुकूम चंद्रपूर, भवानजीभाई चव्हाण हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय मुल रोड चंद्रपूर, सेंट मायकेल इंग्लीश स्कूल नगिनाबाग चंद्रपूर, सरदार पटेल महाविद्यालय,चंद्रपूर, बि.जे.एम.कॉरमेल अकॅडमी, तुकूम, चंद्रपूर, मांऊट कॉरमेल कॉन्व्हेंट, चंद्रपूर, डॉ. आंबेडकर महाविद्यालय सिव्हील लाईन चंद्रपूर, श्री. साई पॉलीटेक्नीक नागपूर रोड चंद्रपुर, या उपकेंद्राला आदेश लागू असणार आहे.

सदर आदेश हा  दि.  २१ ऑगस्ट  २०२२ रोजी चंद्रपूर मुख्यालयातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पुर्व परिक्षा – २०२२  चे परीक्षा उपकेंद्रावर सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत अंमलात राहील. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास संबधीत व्यक्ती वा इसम प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button