चंद्रपूरताज्या बातम्यामहाराष्ट्र

चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे कार्याचा उल्लेख करुन बँकेच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान

चांदा ब्लास्ट

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. संतोषसिंह रावत यांचे संकल्पनेतुन व संचालक मंडळाचे सहकार्याने यावर्षी सुध्दा स्वातंत्रयदिनाचे शुभमुहुर्तावर दि. १५ ऑगष्ट २०२२ रोजी बँकेच्या प्रमुख कार्यालयांत बँकेच्या सेवेतुन सेवानिवृत्त झालेल्या ९ कर्मचा-यांचा शॉल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यांत आला. सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांचे कार्याचा उल्लेख करुन बँकेच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान असल्याचे मत व्यक्त करुन त्यांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या

याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना बँकेचे अध्यक्ष श्री. संतोषसिंह रावत यांनी बँकेच्या प्रगतीचा उल्लेख करून संचालक मंडळ हे विविध धोरण व दिशा ठरवितात तर कर्मचारी हे त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी करीत असल्यामुळे सहकारी बँकांमध्ये आपली बँक राज्यात तृतीय क्रमांकावर असल्याचे सांगीतले. ३१ मार्च २०२२ अखेर बँकेचा नेट एनपीए ० टक्के आलेला आहे. सध्या पावसामुळे ओल्या दुष्काळाचे सावट असून ओला दुष्काळ जाहीर होणार असल्यामुळे कर्जवसुलीची शक्यता कमी असल्यामुळे एनपीए वाढणार नाही याची कर्मचा-यांनी काळजी घ्यावी व तसे कामाचे नियोजन करावे असेही सांगीतले.

बॅकेचे संचालक डॉ. ललित मोटघरे यांनी कर्मचा-यांना मार्गदर्शन करतांना बँकेचे अध्यक्ष श्री. रावत साहेब यांचे समर्थ नेतृत्वामुळे व कर्मचा-यांचे मेहनतीमुळे बँकेची ढेपाळलेली आर्थिक स्थिती पूर्वपदावर आल्याचे गौरवोद्गार काढुन अभिनंदन केले.

या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी बेंकेचे संचालक सर्वश्री डॉ. विजय देवतळे, राजेश रघाताटे, प्रा. ललित मोटघरे, चंद्रकांत गोहोकार, व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजेश्वर कल्याणकर उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमुख कार्यालय व स्थानिक शाखांमधील कर्मचा-यांची मोठया प्रमाणावर उपस्थिती होती.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button