ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्काऊट गाईड तंबू गॅजेट तयार करण्याचे प्रशिक्षण संपन्न

20 रोव्हर्स रेंजर्स 'मास्टर ट्रेनर्स'

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

येत्या जानेवारी महिन्यात स्काऊट व गाईडच्या अभ्यासक्रमावर आधारित 37वा जिल्हा स्काऊट व गाईड मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून यात सहभागी स्काऊटस व गाईड्स ना तंबू सजावट करताना विविध वस्तू ठेवण्याकरीता ‘गॅजेट’ तयार करण्याचे प्रशिक्षण मिळावे म्हणून रोव्हर्स व रेंजर्स ना 25 डिसेंबर ते 27 डिसेंबर दरम्यान तिन दिवसीय ‘मास्टर ट्रेनर्स’ चे प्रशिक्षण स्थानिक एस.एस.एन.जे.महाविद्यालयात देण्यात आले.

यात 20 रोव्हर्स व रेंजर्स ना रोव्हर स्काऊटचे जिल्हा आयुक्त कॅप्टन मोहन गुजरकर व जिल्हा संघटक नितेश झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ स्काऊट मास्टर दत्ताराज भिषणूरकर व रोव्हर लिडर संतोष तुरक यांनी प्रशिक्षण दिले. यात रोव्हर साहील रामगडे, रितेश बुटे, प्रतीक क्षीरसागर, रूपेश वैद्य, सुजल पराते, प्रितेश बोडे, आदित्य तामगाडगे, वैष्णवी शिरभाते, नैना गवळी, सत्तेशवरी सावरकर, समिक्षा मराठे, श्रद्धा मडावी, मयुरी पेटकर, रविना मून, साक्षी येळणे, अंजली कामडी, अनूश्री खंडारे अपेक्षा नेवारे व आदित्य मसराम यांचा मास्टर ट्रेनर्स म्हणून सहभाग होता.

जिल्हय़ातील निवडक शाळेतील स्काऊट व गाईड शिक्षक आपल्या स्काऊटस व गाईड्स सह सदर गॅजेट तयार करण्याचे प्रशिक्षण घेण्याकरिता 28 डिसेंबर रोजी स्थानिक एस.एस.एन.जे.महाविद्यालयातील “स्काऊट भवन’ येथे सहभागी होणार आहेत.

कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमाचे संचालन राज्य पुरस्कार प्राप्त रोव्हर संकेत हिवंज याने तर आभार आसीफ शेख याने मानले. यशस्वीतेकरीता रोव्हर अक्षय जबडे, शेखर भोगेकर व रोव्हर्स-रेंजर्स नी प्रयत्न केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये