ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हेल्पिंग हँड्स तर्फे महामानवास अनोखे अभिवादन

'एक वही एक पेन' या अभियानातर्फे हेल्पिंग हँड्स ने केले महामानवास अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी स्थानिक एनजीओ हेल्पिंग हँड मल्टीपर्पस सोसायटी, भद्रावती द्वारा ‘एक वही – एक पेन’ हा अनोखा अभियान घेऊन महामानवास अभिवादन करण्यात आले.

एक वही एक पेन या अभियानांतर्गत हेल्पिंग हँड च्या टीमने भद्रावती वासियांना या महापरिनिर्वाणदिनी वही आणि पेन अर्पण करावी असे आवाहन केले होते. या अभियानाला शहरातील अनेक नागरिकांनी आपला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या अभियाना मार्फत जमा झालेल्या वही आणि पेन भद्रावती परिसरातील, खेड्यापाड्यातील अनेक गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत व्हावी या अनुषंगाने वाटप करण्यात येणार आहे.

दिवसभर पावसाची साथ असूनही हे अभियान अगदी खंबीरपणे पार पाडणारे; राजरत्न पेटकर, कृतांत सहारे, सुकेशिनी मानकर, प्राची वेल्हेकर, रीता सहारे, प्रणय कांबळे, बादल बाराहाते, आकाश सिंग, सुरज कांबळे, वैभव पाटील, वैभव मानकर, व हेल्पिंग हँड संस्थेतील इतर सदस्य आणि भद्रावती वासियांनी आपले मोलाचे योगदान दिले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये