चंद्रपूरताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोविड व्‍हॅक्‍सीन अमृत महोत्‍सवाअंतर्गत अतिरिक्‍त लसटोचकासाठी चंद्रपूर जिल्‍हयाला ५७ लक्ष ७५ हजार रू. निधी मंजूर.

वन व सांस्‍कृतीक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलीत.

चांदा ब्लास्ट

भारतीय स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवाचे औचित्‍य साधत आजादी का अमृत महोत्‍सव ७५ दिवस कोविड लसीकरण कार्यक्रमासाठी अतिरिक्‍त लसटोचक अर्थात व्‍हॅक्सिᛒनेटर मनुष्‍यबळासाठी चंद्रपूर जिल्‍हयाला रू.५७,७५,०००/- इतका निधी उपलब्‍ध करण्‍यात आला आहे. वन व सांस्‍कृतीक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात केलेल्‍या पाठपुराव्‍याला यश प्राप्‍त झाले आहे.

दिनांक १५ जुलै २०२२ ते ३० सप्‍टेंबर २०२२ या ७५ दिवसांच्‍या कालावधीमध्‍ये कोविड व्‍हॅक्‍सीन अमृत महोत्‍सवानिमीत्‍त सर्व शासकीय कोविड लसीकरण केंद्रांवर १८ वर्षावरील सर्व पात्र नागरिकांना त्‍यांचा प्रिकॉशन डोस मोफत देण्‍याच्‍या प्रक्रियेत ही मोहीम राबविण्‍यासाठी चंद्रपूर जिल्‍हयाला अतिरिक्‍त लसटोचक यांची आवश्‍यकता असल्‍याने एकूण रू. रू.५७,७५,०००/- निधीची आवश्‍यकता असल्‍याचे जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी जिल्‍हा परिषद चंद्रपूर यांनी अतिरिक्‍त संचालक आरोग्‍य सेवा राज्‍य कुटूंब कल्‍याण यांना कळविले होते. वन व सांस्‍कृतीक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी या मागणीच्‍या अनुषंगाने पाठपुरावा करून सदर निधी मंजूर करविला आहे. त्‍यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूर जिल्‍हयात कोविड व्‍हॅक्‍सीन अमृत महोत्‍सवाअंतर्गत १८ वर्षावरील पात्र नागरिकांना त्‍यांचा प्रिकॉशन डोस आता मोफत उपलब्‍ध होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button