ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हक सैलानी घोषणांनी सास्ती दुमदुमली

वाघ आणि तंट्या भील यांच्या नृत्याने मंत्रमुग्ध झाले  

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

बल्लारपूर :- सास्ती गावात हजरत बाबा सैलानी शाह यांचा पाचवा उर्स मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी सैलानी दरबार सस्तीच्या वतीने बबनराव धानोरकर, नूरखान पठाण, किशोर माडगुलवार, जावेद साहेब, प्रशांत मेश्राम व दरबारचे खादीम नळे गुरुजी, अलमरुफ रहेमान अलीशाह यांचा सत्कार करण्यात आला व गावातील हुशार विद्यार्थी साक्षी विजय चन्ने, वैष्णवी मारोती जीवतोडे, तृनाल भावीदास बुटले आणि अथर्व अनिल बोनगिरवार यांना स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

  सायंकाळी 6 वाजता वाघ, तंट्या व सिंदीसह वाद्येसह मिरवणूक काढण्यात आली. तंट्या सरमन बंसल, सिंदी बबलू बंसल, वाघ राकेश बंसल तसेच अमन बंसल यांनी नृत्य केले. प्रत्येक मोहल्यातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संपूर्ण गाव परिसर ‘या सैलानी, हक सैलानी’ च्या घोषणांनी दुमदुमून गेला.

        उर्स शरीफ मिरवणुकीत गावातील रसिक सह अनेक गावातील रसिकही सहभागी झाले होते व उपस्थित होते. शेवटी दरबारात पोहोचल्यावर चादर चढविण्यात आले.रात्री आठ वाजता लंगर सुरू झाला. गयासुद्दीन कव्वाल यांनी कव्वाली सादर केले. प्रेक्षक बाबांच्या गाण्यांवर नाचत कव्वालीचा आनंद घेत होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सीनू पेरलावार, सतीश नळे, तुषार रोगे, विकास पेटकर, संघपाल नगराळे, अविनाश ठाकरे, लिंगु बुटले, अरुण मेहर, मनोहर रोगे यांनी परिश्रम घेतले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये