चंद्रपूरताज्या बातम्यामहाराष्ट्र

वर्धेच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांची बदली

नवे जिल्हाधिकारी म्हणून राहुल कर्डीले यांची नियुक्ती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी अविनाश नागदेवे

कर्डीले यांनी यापूर्वी विदर्भात चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहलेले आहे.

वर्धा लोकप्रतिनिधी सोबत विसंवाद झाल्याने चर्चेत आलेल्या वर्धेच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांची अखेर बदली झाली असून नवे जिल्हाधिकारी म्हणून राहुल कर्डीले यांची नियुक्ती करण्यात आली आहे

कर्डीले यांनी यापूर्वी विदर्भात चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहलेले आहे. देशभ्रतार यांच्या बदलीमागे विविध कारणे दिली जातात. पण प्रामुख्याने भाजपच्या लोकप्रतिनिधी सोबत त्यांचे अनेकदा खटके उडाल्याचे सांगितल्या जाते.
जिल्ह्यातील भाजपचे खासदार रामदास तडस तसेच आमदार डॉ पंकज भोयर, दादाराव केचे व समीर कुणावार पुलगांव टाईम्स पुलगांव जि वधॉ चे संपादक अनुपकुमार भागॅव,पंचनामा चे मंगेश चोरे सह अनेकांनी मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव भूषण गगराणी यांच्याकडे देशभ्रतार यांच्या कार्यपद्धती बाबत नाराजी नोंदविली होती,अशी चर्चा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button