ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“मान कर्तृत्वाचा सम्मान नेतृत्वाचा” पुरस्काराने दयानंद राठोड होणार सम्मानीत !

स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने पुरस्कार जाहीर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून दिला जाणारा “मान कर्तृत्वाचा सम्मान नेतृत्वाचा” हा राज्यस्तरीय पुरस्कार २०२३ चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम, आदीवासी बहुल भाग व नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या जिवती तालुक्यातील झानेरी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते तथा युवा तत्काळ सेवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष दयानंद देविदास राठोड यांना जाहीर झाला आहे. सदर पुरस्कार रविवार ३० जुलै रोजी अहमदनगर येथे वितरित केला जाणार आहे. यादवराव पावसे यांच्या प्रेरणेने होणाऱ्या या सोहळ्यास यावेळी सरपंच चळवळीचे नेते बाबासाहेब पावसे, प्रदेशाध्यक्ष रोहित पवार, संपर्क प्रमुख अमोल शेवाळे, राज्यसंघटक रवींद्र पवार, सुजाता कासार आदींची उपस्थिती असणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये