ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शरदराव पवार महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

स्पर्धा परीक्षां ही विद्यार्थ्यांची क्षमता विकसित करणारी संरचना - डॉ.किरणकुमार मनुरे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

   स्पर्धा परीक्षा ही विद्यार्थ्यांमधील क्षमता विकसित करणारी संरचना असून स्पर्धात्मक परिस्थितीत विद्यार्थ्यांचे ज्ञान आणि कौशल्य तपासण्याचे महत्त्वाचे साधन आहे यावेळी त्यांनी समाजकार्य, संगणक आणि व्यवस्थापन, शाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे महत्त्व व त्यामधील रोजगाराच्या संधी यावर चंद्रपूर येथील सुशीलाबाई मामोडवार समाजकार्य महाविद्यालयाचे डॉ.किरणकुमार मनुरे यांनी केले.

              या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.आनंदराव अडबाले तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य संजयकुमार सिंग व विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. संजय गोरे तर विशेष अतिथी म्हणून सुशीलाबाई मंमीडवार समाजकार्य महाविद्यालयाचे डॉ.सुभाष गिरडे इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

         या वेळी डॉ.सुभाष गिरडे म्हणाले स्पर्धा परीक्षा देणे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान कौशल्य आणि योग्यतांची मूल्यांकन होते आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. यावेळी डॉ.संजय गोरे यांनी महाविद्यालयातून पदवी घेऊन एम.एस. डब्ल्यू, एमसीए,एमबीए हे पदव्युत्तर अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती दिली आणि यावेळी या माजी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

  या कार्यक्रमाचे संचालन डॉ.शरद बेलोरकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार डॉ.माया मसराम यांनी मानले. यावेळी डॉ .हेमचंद दुधगावली,डॉ.राजेश गायधनी,डॉ सतेंद्र सिंह,प्रा.मंगेश करंबे इत्यादी उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये