ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

टी.ई.ई.एन.एस. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा ब्रम्हपुरी येथे शिबिर संपन्न

ब्रम्हपुरी येथील अधिकारी अंमलदार असे एकुण २५० प्रतिनिधी उपस्थीत होते

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

ब्रम्हपुरी :- राजीव गांधी सभागृह ब्रम्हपुरी येथे दि. 23/4/2024 ला Teachers, Educating, Empowering & Nurturing Students या प्रशिक्षण कार्यक्रमाचा ब्रम्हपुरी येथे शिबिर संपन्न झाला यात बालक देशाची संपत्ती, उद्याची पिढी / भविष्य मानली जाते, तिचे योग्य प्रकारे पालन-पोषण, संवर्धन व्हावे, निकोप, शारीरिक, मानसिक, बौध्दिक आणि सामाजिक विकास व्हावा, बालकास अत्याचारांपासुन संरक्षण मिळावे, बालपण सुदृढ रहावे, बालकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, बालकांचे कोणत्याही प्रकारच्या शोषणापासुन संरक्षण व्हावे या मुख्य हेतुने “The Protection of Children from Sexual Offences (POCSO) Act 2012” या नावाने केंद्र सरकारने बालकांच्या संधणार्थ सन 2012 मध्ये विशेष कायदा पारित केला. स्त्रिया, मुले, मुलीवरील अन्याय, अत्याचार दूर करण्यासाठी प्रभावी कायदे आणि त्याची कठोर अंमलबजावणी आवश्यक आहे. परंतू त्याचबरोबरच आवश्यक आहे ती जनजागृती. विद्यार्थयांना योग्य वेळी मार्गदर्शन अत्यंत महत्वाचे आहे. त्याच प्रमाणे वाढते सायबर अपराधांची घटना पाहता सायबर सुरक्षा व उपाय योजना याविषयावर सुध्दा शाळा-महाविद्यालयात सदर जागरुकता उपक्रम राबविले तर विद्यार्थी विद्यार्थीनीमध्ये स्व-संरक्षणबाबत आणि सायबर सुरक्षा, अंमली पदार्थाचे दुष्परिणाम, वाहतुक नियमन बाबत जागरुकता निर्माण होऊन, निश्चितच वाढत्या गुन्हयांचे प्रमाण कमी व्हायला मदत होईल, सदर बाबत जागरुकता उपक्रम हा शालेय / महाविद्यालयीन शिक्षकांकडुन राबविल्यास त्याचा उत्तम प्रतिसाद विद्यार्थ्यांमध्ये मिळून येईल अशी संकल्पना श्री आयुष नोपानी, सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांनी मांडल्याने श्री रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी, पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर जिल्हा परिषद चंद्रपूर आणि जिल्हा विधी सेवा प्रधिकरण यांचे संयुक्त विद्यमाने ब्रम्हपुरी तालुक्यातील सर्व शाळेतील प्रत्येकी एका शिक्षकासाठी तसेच ब्रम्हपुरी हद्दीतील पोलीस पाटील यांच्यासाठी दिनांक 23/01/2024 रोजी सकाळी 11/00 वा. ते सायंकाळी 17/00 वाजेपर्यंत राजीव गांधी सभागृह ब्रम्हपुरी येथे T.E.E.N.S. (Teachers, Educating, Empowering & Nurturing Students) एक दिवसीय शिक्षक / पोलीस पाटील प्रशिक्षण शिबिर चे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक 23/01/2024 रोजी राजीव गांधी सभागृह ब्रम्हपुरी येथे T.E.E.N.S. (Teachers, Educating, Empowering & Nurturing Students) एक दिवसीय शिक्षक / पोलीस पाटील प्रशिक्षण शिबिर कार्यक्रमात मा. श्री. दिनकर ठोसरे उप विभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी, मा. श्री. संजय पुरी गट विकास अधिकारी ब्रम्हपुरी, मा. श्री. अनिल जिल्हावार पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी, श्री. वैभव कोरवते सहायक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी हे उपस्थित होते. तसेच मार्गदर्शक श्री सुमीत जोशी, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर चंद्रपूर, पोलीस उपनिरीक्षक रोशन ईरपाचे कम्युनिटी सेल चंद्रपुर तसेच सायबर पोस्टेचे पोलीस हवालदार मुजावर अली यांनी मार्गदर्शन केले.

सदर प्रशिक्षण शिबिर कार्यक्रमात श्री. अनिल जिट्टावार पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी यांनी आपले भाषणात सदर प्रशिक्षण शिबिर हे मा. श्री. रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांच्या संकल्पनेतुन घेण्यात येत असुन सदर प्रशिक्षण शिबीर घेण्याचा उद्देश्य हा शिक्षकांना लैंगिक गुन्हयापासुन बालकांचे संरक्षण कायदा-2012, सायबर गुन्हे व उपाय योजना, अमली पदार्थांचे दुष्परिणाम व उपाय योजना, बालकांचे मानसशास्त्र आणि शिक्षकांची समस्या या विविध विषयावर पहिल्यांदाच पोलीस विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमानाने हा अभिनव प्रशिक्षण शिबीर आयोजित केलेला असुन शिक्षकांनी सदर प्रशिक्षण पूर्ण करुन आप-आपले शाळा / महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना तसेच त्यांच्या पालकांमध्ये याविषयाबाबत सविस्तर मार्गदर्शन करावे असे आवाहन केले. तसेच उपस्थित पोलीस पाटील यांनी ही आप आपल्या गावांमध्ये नागरिकांना याविषयाबाबत सविस्तर मार्गदर्शन करावे असे आवाहन केले.

सदर शिक्षक प्रशिक्षण शिबीराचे मार्गदर्शक श्री सुमीत जोशी, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर चंद्रपूर यांनी पॉवरपॉईन्ट प्रेझेन्टेशनच्या माध्यमाने पॉक्सो गुन्हे (लैंगिक गुन्हयापासुन बालकांचे संरक्षण कायदा -2012) या कायद्यातील विविध तरतुदी सह बाल विवाह कायदा बाबत सविस्तर मार्गदर्शन करुन 18 वर्षाखालील बालके (मुले, मुली व तृतीयपंथी) यांना गुड टच-बैंड टच बाबत माहितीदेवुन त्यांच्या संरक्षणासाठी सन 2012 वर्षी अस्तिवात आलेल्या पोक्सो कायद्याची जाणीव करुन दयावी, तसेच सदर कायद्यामुळे होणा-या शिक्षेची तरतुद व परिणामी त्यांचे जिवनावर होणारे विपरीत परिणामाची माहितीसह पालकांना सुध्दा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्याबाबत उपस्थित शिक्षकाना तसेच पोलीस पाटील यांना आवाहन केले,

सायबर गुन्हे आणि उपाय योजना याबाबत पोलीस उपनिरीक्षक रोशन ईरपाचे कम्युनिटी सेल चंद्रपुर तसेच सायबर पोस्टेचे पोलीस हवालदार मुजावर अली यांनी सुध्दा पॉवरपॉइंट प्रेझेन्टेशन व व्हिडीओ दाखवुन सायबर युगातील धोके व त्याचे उपाय योजना बाबत सविस्तर माहिती देवून शिक्षकांना शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थयांना सायबर गुन्हयापासुन परावृत्त करण्यासाठी शिक्षणादरम्यान इंटरनेट / मोबाईलच्या केलेल्या दुरुपयोगाचे दुष्परिणाम बाबत घडलेल्या गुन्हयांचे उदाहरणे देवुन शालेय / महाविद्यालयीन जिवनात मोबाईल तंत्रज्ञानाचा सदुपयोग करुन आपले जिवन कसे साध्य करता येईल याबाबत करावयाची उपाय योजना बाबत सविस्तर माहिती देवुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याबाबत कळविले.

सदर कार्यकमात जिल्हा परिषद अखत्यारातील ब्रम्हपुरी तालुक्यातील सर्व खाजगी माध्यमिक शाळेतील 161 शिक्षक उपस्थित होते, तसेच ब्रम्हपुरी तालुक्यातील 70 पोलीस पाटील तसचे पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथील अधिकारी अंमलदार असे एकुण 250 प्रतिनिधी उपस्थीत होते, सदर प्रशिक्षणाअंती सर्व उपस्थित शिक्षकांचे फिडबैंक घेतले असता त्यांनी सदर प्रशिक्षणामुळे त्यांना व त्यांचे शाळेतील विद्यार्थयांना पॉक्सो गुन्हे (लैंगिक गुन्हयापासुन बालकांचे संरक्षण कायदा -2012) बाबत तसेच सायबर सुरक्षा बाबत जागरुक करण्यावर उत्तम माहिती प्राप्त झाल्याचे सांगुन त्याचा लाभ निश्चितच शालेय विद्यार्थ्यांना होईल याची शास्वती दिली आहे.

सदर कायक्रमाचे प्रास्तावीक भाषण श्री. अनिल जिट्टावार पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी यांनी केले असुन कार्यकमाचे सुत्र संचालन प्राध्यापक श्री. प्रशांत डांगे यांनी केले असुन आभार प्रदर्शन श्री. पद्माकर रामटेके सर यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी, पोहवा अरूण पिसे, पोहवा राहुल लाखे, पोअंम नरेश कोडापे यांनी सहकार्य केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये