ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देवाजीबापु खोब्रागडे यांची १२५ वी जयंती उत्साहात साजरी होणार

चांदा ब्लास्ट

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निष्ठावान सहकारी,चंद्रपूरचे प्रथम आमदार,बल्लारपूर नगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष,चंद्रपूर येथील बौध्द धम्मदिक्षा समारंभाचे अध्यक्ष विदर्भातील प्रसिद्ध उद्योगपती पू. देवाजीबापु खोब्रागडे यांची १२५ वी जयंती २ जानेवारी रोजी चंद्रपूर येथे भव्य प्रमाणात आयोजित करण्यात आली आहे.

 सदर कार्यक्रमाची नियोजन सभा चंद्रपूर येथील विविध क्षेत्रातील गणमान्य मान्यवर,प्रतिष्ठित नागरिक आणि समाजबांधवांच्या उपस्थितीत बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे भवन परिसरात आयोजित करण्यात आली होती. तरी जयंती उत्सव साजरा करत असताना प.पूज्य.देवाजीबापू खोब्रागडे शतकोत्तर रजत जयंती महोत्सव समिती,चंद्रपूर ची स्थापना करण्यात आली असून समितीच्या अध्यक्षपदी खोब्रागडे परिवारातील जेष्ठ सुपुत्र प्रवीण हेमचंद्र खोब्रागडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. स्वागताध्यक्षपदी मारोतराव खोब्रागडे तर महासचिव पदी इंजी.किशोर सवाणे यांची निवड करण्यात आली तसेच कार्याध्यक्षपदी दीपक जैस्वाल, नंदू नागरकर, अवतरसिंग गोत्रा, ॲड. वैशाली टोगे, उपाध्यक्षपदी सूर्यकांत खंके,बलराम दोडानी, डी.के. आरिकर, पप्पू देशमुख, अनवर अली, द्रोपदिताई कातकर, सहसचिव पदी एम.ती साव,अशोक टेभरे, राजकुमार जवादे, संजय दुंभेरे, प्रा. नितीन रामटेके, शाहिन शेख, दुशंत नगराळे, प्रा. रोशन फुलकर, पुरणसिंग जुनेजा, यांची निवड करण्यात आली आहे.

          या मध्ये सल्लागार मंडळ, नियोजन समिती, स्वागत समिती, वेवस्तापक समिती, प्रचार व प्रसार समिती गठीत करण्यात आली असून २ जानेवारीला दिवसभराचे भरगच्च आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. ह्या नियोजन समितीचे प्रासताविक प्रतीक डोर्लिकर, संचालन यशवंत मुंजमकर यांनी केले तर आभार प्रेमदास बोरकर यांनी मानले. ह्या नियोजन सभे मध्य सामजिक, राजकीय व सर्व समाज बाधवांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये