ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वैशिष्टपुर्ण याेजना फंडातून “त्या” रस्त्यांची अवदशा आतातरी हटेल का?

मूल न.प. ला ६.२५ कोटी मंजूर

चांदा ब्लास्ट

    मूल बल्लारपुर विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण व शहरी भागात जनतेला पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी क्षेत्राचे आमदार तथा पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुगंटीवार यांचे प्रयत्नातून मूल न.प.ला ६ काेटी २५ लक्ष रूपये मंजुर झालेले आहेत.

वैशिष्टपुर्ण योजनेतून सदर निधी मिळणार असून यातून इतर कामांसाेबत शहरातील विविध रस्ते व सिमेंट कांकीट रस्ते बनविण्यात येणार असल्याने आता तरी १५ ते २० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या व आत्ता नगरविकासाचे आराखडयातुन इतिहासजमा झालेल्या या शहरातील सिमेंट क्रॉकिट रस्त्याचे भाग्य खुलवून अशा रस्त्यावरील रहिवासी यांना दिलासा देऊन वैशिष्टपुणँ काम न.प. प्रशाशकीय यंत्रणा करेल अशी जनतेची अपेक्षा आहे.

               मुलं न.प. अंतर्गत २० वर्षाआधी काही सिमेंट चे रस्ते बनविण्यात आले त. विशेष म्हणजे यात चंद्रपूर महामार्गावरील वॉर्ड १५ मधील प्रा. महेश पानसे यांचे घरापासून तर तिवाडे यांचे घरापर्यन्तचा मार्ग हा राष्ट्रीय महामार्गाची उंची वाढल्यापासुन जागोजागी फुटला असून १ते २ फुटानी खाली गेलेला आहे. गत २ वषॉआधी पावसाळ्यात इथे अनेक घरामध्ये दाेनदा पाणी घुसून नागरिकांना मोठा त्रास सहण करावा लागला हाेता हे विशेष.

         मूल न.प.अंतर्गत रस्ते बांधकामे सा. बा. विभागामार्फत होत असली तरी मात्र न.प. प्रशासनाने सदर रस्त्याची उंची वाढविण्याकरिता तसा प्रस्ताव दिल्यास जनतेच्या भल्याचे एक वैशिष्टपुणँ काम हाेईल असे परिसरातील जनतेची विनंतीवजा मागणी आहे.

    मूल न.प. चे क्रियाशिल मुख्याधिकारी यांना या मार्गाची अवदशा ज्ञात असून त्यांनी सकारात्मकतेने सा.बा. विभागाकडे प्रस्ताव देऊन या मार्गावरील जनतेला दिलासा दयावा अशी अपेक्षा आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये