ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे पिकांचे मोठे नुकसान

पंचनामे करून मदत देण्याची ॲड.वामनराव चटप यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

चांदा ब्लास्ट

दि.२६ व २७ नोव्हेंबर २०२३ रोजी अवकाळी पावसाचा जोरदार फटका विदर्भातील सर्वच जिल्हयांना बसला आहे. यामुळे पुर्व विदर्भातील व पश्चिम विदर्भातील कापूस, धान, मिरची पिकविणा-या शेतक-यांचे हाती आलेले पिक या पावसामुळे उध्वस्त झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करीत नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार ॲड.वामनराव चटप यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचेकडे केली आहे.

                 शेतमाल लागवडीसाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला असुन यावर्षी पुर, सोयाबिन पिकावर आलेला रोग यामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले. आता या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदील झाला असुन त्याला तातडीने मदतीची गरज आहे. सरकारने मागील वर्षी मदतीची रक्कम प्रती हेक्टर १३६०० प्रमाणे तीन हेक्टर साठी ४०८०० रूपये मदत दिली होती. मात्र यावर्षी तिन हेक्टर साठी ८५०० रूपये प्रमाणे २५५०० रूपये मदत देण्याचे घोषित केले. सरकारच्या या शेतकरी विरोधी धोरणामुळे सतत शेतकरी आत्महत्या होत आहेत. आता या अवकाळी पावसाने पिके उध्वस्त झाल्याने तातडीने पंचनामे करून एकरी किमान २५ हजार रूपये नुकसानभरपाई द्यावी,

 अशी मागणी माजी आमदार वामनराव चटप यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे,कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचेकडे केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये