Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

शास. औ. प्र. संस्थेत राष्ट्रीय गणित दिन संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

   शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील गणित चित्रकला विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने थोर गणितज्ञ ‘श्री निवास रामानुजन’ यांच्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय गणित दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.

    सिपेट सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रासेयो कार्यक्रम अधिकारी बंडोपंत बोढेकर होते.उद्घाटन माजी प्राचार्य तथा ज्येष्ठ गणित अभ्यासक रमेश पायपरे यांच्या हस्ते झाले. यावेळी पत्रकार संतोष यादव, गणित चित्रकला निदेशक रमेश रणदिवे, अजय मार्तिवार, किशोर इरदंडे,अभय घटे, सचिन महिंद्रकर आदींची उपस्थिती होती. गणित विषयावरील प्रश्नमंजुषा स्पर्धेत मनिष गणेशकर, रोहित वानखेडे, क्रिष्णा जीवतोडे, प्रणय शेंडे, सुमित साळवे या गटांनी विजय मिळवला. त्यांना अतिथींच्या हस्ते रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच गणित विषयातील बेस्ट रेकॉर्ड आणि बेस्ट प्रेझेंटी या अंतर्गत शबनम सिद्दिकी, विशाल जाधव, विशाखा बोन्सुले, मयूर दडवे, सुधीर गोंगले,रीना लोणबले, सलोनी लोहकरे , रूपाली सोनटक्के, हिरोद लोणबले, हर्षल कळसकर,समीक्षा साव, मानसी थेरे, सांची राऊत ,चेतक चल्लावार,नम्रता खंडाळकर, प्रणय दूधबावरे , पवन गजबे, दुर्गा पेटकुले आदी प्रशिक्षणार्थ्यांना यावेळी अतिथींच्या हस्ते ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

     यावेळी रमेश पायपरे म्हणाले की, गणित विषयाची अकारण भिती न बाळगता या विषयाचा सराव करावा, असे आवाहन केले. तर श्री. बोढेकर यांनी पायपरे गुरूजी हे जिल्हातील गणितासाठी समर्पित असे व्यक्तिमत्व असा उल्लेख करून मनुष्याच्या अंतिम श्वासापर्यंत गणित सोबत असते. गणितामुळे वैचारिक पातळी उंचावते व मेंदूची निर्णय घेण्याची क्षमता वाढते, एकंदरीत मेंदूचा उत्तम विकास होतो. थोर गणितज्ञ रामानुजन यांचे गणितीय संशोधन जगाने मान्य केले. त्यांच्या जीवन चरित्रांपासून प्रेरणा घ्यावी असे प्रतिपादन श्री. बोढेकर यांनी केले. प्रास्ताविक श्री. इरदंडे यांनी केले तर रामानुजन यांच्या जीवनावर श्री. मार्तिवार यांनी प्रकाश टाकला.

शेवटी पेंटर व्यवसायाचे मारोती टेकाम यांच्या नृत्याने समारोप झाला. सूत्रसंचालन कु. खुशी राय यांनी केले तर आभार प्रदर्शन अभय घटे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वागत समितीच्या कु. गौरी सावे, सोनाक्षी तेलंग, श्रुती खाडे, रूपाली कामतवार, प्रज्वल लिपटे, अथर्व चौधरी, निधी झाडे आदी रासेयो स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये