ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दारूबंदीसाठी महिला धडकल्या पोलीस ठाण्यात

चकपिरंजी येथील प्रकार ; दारुबंदीसाठी ग्रामसभेत घेतला ठराव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

 ग्रामपंचायत कार्यालय चकपिरंजी ते पोलीस स्टेशन सावली असा तब्बल ४ किलोमीटर पायदळ रॅली काढून पोलीस स्टेशन येथे निवेदन दिले.

चकपिरंजी गावामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारूचे धंदे चालू आहे या दारूमुळे गावातील अनेक कुटुंब उध्वस्त होत आहेत, अनेक नागरिकांना आपले जीव सुद्धा गमवावे लागले आहेत. दारूमुळे गावामध्ये भांडण तंटे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. येणाऱ्या पिढीचे आयुष्य हे धोक्याचे ठरत आहे. या अवैद्य दारूमुळे गावातील नागरिकांना, महिलांना व शाळेकरी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत मध्ये दि. ०३/१०/२०२४ रोज झालेल्या ग्रामसभेमध्ये जो गावात दारू विकणार त्याला व त्याच्या कुटुंबाला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ दिल्या जाणार नाही, कोणतेही ग्रामपंचायतचे व शासकीय कागदपत्रे दिले जाणार नाही, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी या योजनेत त्याला व त्यांच्या कुटुंबाला कामावर घेतल्या जाणार नाही, राशन मिळणार नाही व कागदपत्र दिल्यास ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असा ग्रामसभेचा ठराव सर्वांनुमते पारित करण्यात आला.

या दारू विक्रेत्यांवर आळा घालण्यासाठी चकपीरंजी गावातील अवैद्य दारु विक्रेत्यांवर कठोर कारवाई करून गावातील नागरिकांना सहकार्य करावे असे निवेदनाच्या माध्यमातून पोलीस स्टेशन येते कडवण्यात आले त्यानुसंगाणे चकपीरंजी गावातील अवैद्य दारू बंद झाली नाही किंवा चकपीरंजी वासियांना न्याय मिडाल नाही तर आम्ही सर्व ग्राम वासिय पोलीस स्टेशन सावली च्या समोर आम्हाला न्याय मिळेपर्यंत उपोषणाला बसून आंदोलन करु.

 चकपिरंजी ग्राम वासियांना विश्वास आहे की, आमच्या निवेदनाचा स्वीकार करून आमच्या गावाच्या हितासाठी योग्य तो निर्णय घेऊन आपण सहकार्य करावे असा निवेदन पोलीस स्टेशन सावली येथे देण्यात आला. यावेळी महिला संघटनेचे अध्यक्ष चैतालीताई येल्लेटीवर, उपाध्यक्ष अश्विनीताई भोपये, कोषाध्यक्ष वैशालीताई चौधरी, पोलीस पाटील ईश्वरजी मेश्राम,प्रफुल निरुडवार,लक्ष्मीजी मंडरे,विनोद मडावी,पुणेश्वर येल्लेटीवर, प्रभाकर चौधरी व गावातील बहुसंख्य महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये