चंद्रपूरचांदाब्लास्ट विशेषविदर्भ

शून्य मृत्यूसह 17 कोरोनामुक्त, 19 पॉझिटिव्ह

सध्या 135 बाधितांवर उपचार सुरू

चांदा ब्लास्ट : तालुका प्रतिनिधी

आशीष रेचं, राजुरा

गत 24 तासात जिल्ह्यात 17 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 19 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात रविवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 19 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 6, चंद्रपूर तालुका 0, बल्लारपूर 1, भद्रावती 3, ब्रम्हपुरी 0, नागभीड 1, सिंदेवाही 0, मुल 0, सावली 0, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 4, राजूरा 0, चिमूर 0, वरोरा 3, कोरपना 1, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 931 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 83 हजार 263 झाली आहे. सध्या 135 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 94 हजार 303 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 5 लाख 5 हजार 974 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1533 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे
00000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button