ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आळंद येथे घरफोडी

5.32 लाखाचा ऐवज लंपास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

येथून जवळच असलेल्या आळंद येथील शेतकरी संतोष सखाराम खार्डे यांच्या घरातून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 5 लाख 32 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना 18 डिसेंबर ला घडली.

संतोष खार्डे हे सकाळी कुटुंबासह घर बंद करून शेतातील कापूस वेचण्यासाठी शेतात गेले होते, अज्ञात चोरांनी दरवाजा चा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश केला, व घरातील लोखंडी कपाट चे दरवाजे तोडून दागिने व रोख रक्कम 90 हजार असा एकूण 5 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

या प्रकरणी पोलीस स्टेशन देऊळगाव राजा येथे तक्रार दाखल केली असून अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे,तपास सुरू आहे,
सध्या शेतात शेतकरी जात असल्याने चोरट्यांनी आपला मोर्चा ग्रामीण भागात वळविला आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये