ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ले-आऊट मधील रस्ते व ओपन स्पेस मोकळे करा

साईनगर वासियांचे पत्र परिषदेतून नगर परिषदेला आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        शहरातील विजासन रोडवरील साईनगर ले-आऊट मधील काही रस्ते व दोन ओपन स्पेस वैयक्तिक वापरामुळे बंद पडलेले आहे. या संदर्भात ले-आऊट मधील नागरिकांनी नगरपरिषद, तहसील कार्यालय तथा जिल्हाधिकारी कार्यालयात अनेकदा निवेदने व स्मरणपत्रे दिलेली आहे. याविषयी नगर विकास मंत्रालयाला सुद्धा निवेदन देण्यात आले आहे. मात्र याकडे संबंधित विभागांकडून सतत दुर्लक्ष करून याची दखल घेण्यात न आल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

संबंधित विभागांनी याची त्वरित दखल घेऊन ले-आऊट मधील रस्ते व ओपन स्पेस नागरिकांसाठी त्वरित मोकळे करून द्यावे अशी मागणी करून याची दखल न घेतल्यास याविरोधात लोकशाही पद्धतीने आंदोलन करावे लागेल असा इशारा साईनगर येथील नागरिकांनी घेतलेल्या एका पत्र परिषदेतून देण्यात आला आहे. भूमापन क्रमांक 63 व 68 मध्ये साईनगर वसलेले आहे. या ले-आऊट मधील काही रस्ते व ओपन स्पेस अवैध बांधकामामुळे बंद पडले असल्याचा आरोप पत्र परिषदेतून करण्यात आला आहे. याबाबत वारंवार नगरपरिषद कार्यालयाकडे निवेदने सादर करून याचा पाठपुरावा करण्यात आल्याचे पत्र परिषदेतून सांगण्यात आले. बंद पडलेले रस्ते व ओपन स्पेस खुले करून देण्यासाठी येथील नागरिकांनी नगरपरिषद कडे सतत पाठपुरावा केला.

मात्र नगर परिषदेकडून याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोपही पत्र परिषदेतून करण्यात आला आहे. या विषयाची आवश्यक कागदपत्रे सुद्धा नगर परिषदेला सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. याविषयी नगरपरिषद तर्फे येथील नागरिकांना ही समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले, मात्र प्रत्यक्षात सदर कार्यालयाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. नगरपरिषदेने याकडे लक्ष देऊन ले-आऊट मधील बंद पडलेले रस्ते व ओपणस्पेस त्वरीत मोकळे करून द्यावे.

अशी मागणी पत्रपरिषदेतून येथील नागरीकांनी केली आहे. पत्रपरीषदेला अशोक हजारे, किशोर पांढरे, गजानन खामनकर,सुनंदा हजारे,ए.एम.देशमुख, प्रकाश खासरे,सुहास कोल्हे, हरीहर येलकर,राजकुमार हातझाडे, मुकेश रोकडे, गणपत ऊमाटे,वर्षा कोल्हे, भुमीका रोकडे, भारती पांढरे, वनीता ऊमाटे, वैशाली खासरे, निता बुरडकर, प्राची खामनकर, विद्या हातझाडे, वैशाली देशमुख, पुजा येलकर, वैशाली झाडे आदी ऊपस्थीत होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये