ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘चुनाव पाठशाळा’ उपक्रम प्रशंसनीय – डाॅ. पाराजे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

‘लोकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करणे आवश्यक असून या दृष्टिकोनातून ‘चुनाव पाठशाळेचा’ उपक्रम प्रशंसनीय आहे, असे प्रतिपादन नायब तहसीलदार डाॅ. शकुंतला पाराजे यांनी स्थानिक एस.एस.एन. जे. महाविद्यालयातील एन.सी.सी. सभागृहात आयोजित ‘चुनाव पाठशाळेचे’ उदघाटन प्रसंगी 2 एप्रिल रोजी केले.

सदर ‘चुनाव पाठशाळा’चा उपक्रम देवळी तहसीलदार कार्यालय, एस.एस.एन.जे.महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना युनिट व राष्ट्रीय सेवा योजना पथक यांच्या विद्यमाने संपन्न झाला.

सदर पाठशाळेचे उदघाटन नायब तहसीलदार डाॅ. शकुंतला पाराजे यांनी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रभाकर ढाले यांच्या उपस्थितीत केले. चुनाव पाठशाळेचे आयोजन एन.सी.सी. अधिकारी तथा रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. मोहन गुजरकर यांनी केले.

 

चुनाव पाठशाळेची सुरवात ‘मतदार जागृती’ शपथ घेऊन झाली. यावेळी रासेयो पथकाने उभारलेल्या माॅडेल ‘मतदान केंद्राचे’ उदघाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होऊन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदान करण्याची प्रकिया पार पाडली. मतदान केंद्राध्यक्ष म्हणून रेंजर वैष्णवी शिरभाते हिने तर मतदान अधिकारी म्हणून कॅडेट मनोज नेहारे, सुजल पराते व साहिल रामगडे यांनी भुमिका पार पाडली. ‘उमेदवार प्रतीनिधी’ म्हणून कॅडेट हरिओम उईके,अर्पित पोराटे, अभिषेक नेहारे, आदर्श नाईक व गिरीधर नेहारे यांनी कामकाज पाहिले.

‘चूनाव पाठशाळा’ अंतर्गत एन.सी.सी.छात्र सैनिक, रासेयो स्वयंसेवक व रोव्हर्स-रेंजर्संनी मतदान प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होऊन ‘मतदान करणे आपली राष्ट्रीय जबाबदारी आहे’ हे कर्तव्य समजून आपले कुटुंबीय, शेजारी, नातेवाईक व परिसरातील लोकांमध्ये जागृती करण्याचा मानस व्यक्त केला.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी ‘मतदान करेंगे हम’ या विषयावर रेखाटलेल्या पोस्टर्सचे प्रदर्शन करण्यात आले. नायब तहसीलदार डा. शकुंतला पाराजे व प्रभारी प्राचार्य डॉ. ढाले यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
संचालन प्रा. मोहन गुजरकर यांनी तर आभार अंडर ऑफिसर राखी खोडे हिने मानले. यशस्वीतेकरीता अंडर ऑफिसर शेखर भोगेकर, अक्षय जबडे, कोमल शितळे, श्रद्धा मडावी, मनिषा मडकाम, रसीका बानकर, साक्षी येळणे व रासेयो स्वयंसेवकांनी प्रयत्न केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये