ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भरधाव जीपने गाडीची वाट पाहत असलेल्या प्रवाशांना उडविले

दोन ठार, दोन जखमी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा ते चिखली रोड वरील दगडवाडी फाट्याच्या समोर अंदाजे एक किलो मिटर अंतरावर गाडीची वाट पाहत उभ्या असलेल्या चार प्रवाश्यांना अज्ञात पांढऱ्या रंगाच्या जीप चालकाने वाहन वेगाने व निष्काळजी पणाने चालवून धडक मारून जखमी केले यात योगेश उत्तमराव जाधव, वय २१रा साखरखेडा व विशाल विठ्ठल काळे, वय २३वर्ष, रा माडनी यांचा मृत्यू झाला आहे, तर गणेश नामदेव धनवटे व प्रताप विष्णू कोरडे वय ३० वर्ष जखमी झाले आहे.

जखमींना पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले, सदर घटना ३ मे च्या मध्यरात्री ११.४५वाजता घडली.

फिर्यादी प्रताप विष्णू कोरडे यांच्या तर्फे पोलिस हेड कॉन्स्टेबल विश्वनाथ काकड यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात जीप चालक विरोधात भा द वी कलम २७९,३०४, ए, ३३७सहकलम १३४ मो वा का अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक चिरडे करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये