ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मा.रामदास आठवले केद्रिंय सामाजीक न्याय मंञी यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान करिता निधीची मागणी करण्यात आली – शारदा झांबरे

नगर परिषदे सोबत त्वरीत चर्चा मागणीची पूर्तता केल्या जाईल असे आश्वाशन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सामाजिक न्याय मंञी रामदास आठवले दिनांक :-६ जुन रोजी रवि भवन नागपुर येथे साविञीबाई फुले महिला बचत गटाच्या अध्यक्षा शारदा झांबरे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान वर्धा येथील उद्यानाचे संपुर्ण माहिती लेखी पञ देवुन व चर्चा केली. सौंदर्याकरण करण्या करिता तसेच अनेक प्रकारच्या सुविधाची कमतरता आहे,मुलांना खेळण्याकरिता खेळनी,फाउटंन, सिक्युरिटी गार्ड रुम , अपंगासाठी रॉम,तलावाच्या मध्येभागात कलर स्टाईल,तसेच अनेक कामे उद्यानात प्रलंबित आहे,या संपुर्ण व्यवस्था या उद्यानात झाल्यास फिरायला येणार्या नागरीकांचे मन प्रसन्न होइल ,जे गार्डन एके काळी जंगलाचे स्वरुप आले होते आज बचत गटाच्या महिलांनी संघर्ष करुन त्या उद्यानाला उभे केले,आणि त्यामुळे वर्धा येथे -महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान आहे असे लोकाच्या निदर्शनात आले, तसेच या उद्याना मुळे अनेक महिलांना रोजगार सुध्दा मिळाला आहे त्यामुळे या उद्याना चे सुशोभिकरण वाढवण्या करिता जास्तीजास्त निधी उपलब्ध करुन देण्यात यावी अशी बचत गटाच्या अध्यक्षा शारदा झांबरे यांनी लेखी पञ देवुन मागणी केली असता मंञी महोदय यांनी वर्धा नगर परिषदे सोबत त्वरीत चर्चा मागणी ची पुरतता केल्या जाईल असे आश्वाशन दिले.निवेदन सादर करतांना सरिता भगत,व बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये