Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

श्रावण बाळ योजनेच्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा फटका

लाभ घेत नसल्याचे शपथपत्र देण्याची अजब अट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

वृद्ध निराधार 65 वर्षावरील वयाच्या महिला पुरुषांसाठी श्रावण बाळ निराधार योजना आहे. मात्र या योजनेसाठी नव्याने अर्ज करणाऱ्या वयोवृद्ध महिलांना लाडकी बहीण योजनेचे लाभ घेत नसल्याचे शपथपत्र दाखल करण्याची नवीनच अट सावली तहसीलदाराने घातल्यामुळे लाभार्थ्यांना आर्थिक भुर्दंडासह पायपीट करावी लागत आहे.

        वृद्ध निराधारांसाठी श्रावण बाळ योजना अनेक वर्षांपासून सुरु आहे. वयाच्या 65 वर्षावरील दारिद्र्य रेषेखालील व 21 हजारच्या आत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना लाभ दिल्या जातो. राज्य शासन व केंद्र शासनाचा निधी या योजनेत दिल्या जात असून राज्याचा हिस्सा चार महिन्यापासून तर केंद्राचा 200 रुपयाचा लाभ मागील वर्षभरापासून लाभार्थ्यांना मिळालेला नाही. निवडणुकीपूर्वी वयाच्या 21 ते 65 वर्षापर्यंतच्या महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली. अनेक महिलांचे आधारकार्ड वरील वय 65 च्या वर असल्याने लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यामुळे त्यांनी श्रावणबाळ योजनेनंतर्गत अर्ज केला आहे.

मात्र सावलीचे तहसीलदार यांनी लाडकी बहीण योजनेचे शपथपत्र दाखल केले नसल्याचे कारण देत अर्ज तृट्यात प्रलंबित ठेवले आहे. शपथपत्र तहसीलदार यांचे समक्ष 100 ऐवजी 500 रुपयाच्या मुद्रांकावर दाखल करायचे असल्याने आर्थिक भुर्दंडही वृद्धाना सहन करावा लागत आहे. लाडकी बहीण योजना शासनाची असून कुणाला लाभ मिळत आहे हे शासकीय विभागात तपासणी करता येत असतांना मात्र वृद्धाना त्रास देणारी अजब अट घातल्याने लाभार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये