ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धा खासदार रामदास तडस इनडोअर स्टेडीयम देवळी,ज़िल्हा वर्धा येथे स्पर्धेचे आयोजन

कुस्ती स्पर्धेमध्ये  दोन दिवसीय आयोजन ; १७ वर्षातील आत  विद्यार्थ्यांचा सहभाग

चांदा ब्लास्ट

फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धा खासदार रामदास तडस इनडोअर स्टेडीयम देवळी,ज़िल्हा वर्धा येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, तसेच कुस्ती स्पर्धेमध्ये  दोन दिवसीय आयोजन करण्यात आले,त्यात १७ वर्षातील आत  विद्यार्थ्यांचा सहभाग झाला होता,या कुस्ती स्पर्धेत एकूण पाच,सहा संघाचा समावेशअसून,स्पर्धेचे निरीक्षक ज़िल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले.

                        तसेच कुस्ती स्पर्धेत अकरावीत शिकत असणारी विधार्थिनी युगाश्री संजय पदमेकर हिने प्रथम क्रमांक पटकावून राजस्तरीय स्पर्धेसाठी ती पात्र झाली आहे .  महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित मॅकरून स्टूडन्ट अकॅडमी चंद्रपूर विध्यार्थांनि   जास्तीत -जास्त टक्के गुण घेत निकालाची  परंपरा कायम जोपासली आहे, तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये अव्वल येऊन शाळेचे नाव मोठे केले आहे.

                   क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत ज़िल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा ज़िल्हा क्रीडा परिषद,चंद्रपूर येथे मनपा स्तरीय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये १४ ते १७  वयोगटात घेण्यात आले. या स्पर्धेत मॅकरून स्टूडन्ट अकॅडमी वडगाव या संघाने प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेसाठी हा संघ प्रात्र झाला आहे.

                 या खेळाडूंना  संस्थेचे संस्थापक  श्री. पी. एस. आंबटकर, सचिव प्रीती पांडुरंगजी आंबटकर ,उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, डायरेक्टर अंकिता पियुष आंबटकर, प्रा. राजकुमार सर,तसेच शिक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले.विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले क्रीड प्रमुख शिक्षक सचिन चापले,निलेश कामडे यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये