ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रामपुरी जंगलात आढळला मृत बिबट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी :- दि. 05/06/2025 रोजी उपक्षेत्र नवेगांव मधील नियतक्षेत्र रामपुरी येथील वनक्षेत्रात सब अॅडल्ट बिबट (मादी) वनरक्षक गस्तीवर असतांना मृत पावल्याचे आज निदर्शनास आले.

सदरची माहीती वरीष्ठ अधिकारी यांना देण्यात आली. त्यानंतर मा. श्री एम. बी. गायकवाड सहाय्यक वनसंरक्षक (प्रादे. व वन्यजीव) ब्रम्हपुरी वनविभाग ब्रम्हपुरी, गा. एस. बी. नरड वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादे.) उत्तर ब्रम्हपुरी, मा. श्री राकेश अहुजा बायोलॉजीष्ट ब्रम्हपुरी वनविभाग व  डब्ल्यु. टी. नवघडे क्षेत्र सहाय्यक नवेगांव, पी. जे. शेंदुरकर क्षेत्र सहाय्यक मेंडकी व क्षेत्रीय वनकर्मचारी उपक्षेत्र नवेगांव व मेंडकी मोकास्थळी हजर झाले. व मोकापंचनामा नोंदवुन उत्तरीय तपासणी करीता विभागीय कार्यालय ब्रम्हपुरी येथे नेण्यात आले.

सदर बिबट (मादी) मृत्युचे कारण शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर कळेल. अशी माहीती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये